Take a fresh look at your lifestyle.

📌 आजचे 12 राशींचे राशिभविष्य

🔸 6 सप्टेंबर 2021

0

 

▪️मेष : घरामध्ये शांत रहा. हिशोब करताना गडबड करू नका. कौटुंबिक कामे प्राधान्याने पूर्ण कराल.

▪️वृषभ : मनातील इच्छा पूर्ण होईल. जोडीदाराबरोबर अनमोल क्षण घालवाल. दिवस प्रेमाने भरलेला राहील.

▪️मिथुन : घरातील कामात अडकून जाल. कौटुंबिक वातावरण खेळकर राहील. कामाची धांदल उडवून घेऊ नका.

▪️कर्क : घरात समजुतीने वागा. अधिकार वाणीने बोलाल. जबाबदारी झटकू नका.

▪️सिंह : कामाच्या ताणामुळे थकवा जाणवेल. हातातील कामे प्रामाणिकपणे व सचोटीने करावीत. अति विचारात वेळ वाया घालवू नका.

▪️कन्या : जोडीदाराच्या मताचा आदर करा. गैरसमजापासून दूर रहा. सामाजिक बांधीलकी जपा. उगाचच मन खिन्न होऊ शकते.

▪️तूळ : दिवसाची सुरुवात आळसात घालवू नका. जोडीदाराच्या इच्छेचा आदर कराल. कामातून अपेक्षित लाभ होईल.

▪️वृश्चिक : छंद जोपासायला वेळ काढावा लागेल. बोलताना समोरच्याचा आदर राखावा. व्यापार्‍यांनी भडक शब्द वापरू नयेत.

▪️धनु : विचारपूर्वक कार्य करा. मानसिक शांतता लाभेल. घरातील वातावरण शांत असेल.

▪️मकर : क्षुल्लक चूक टाळावी. नातेवाईक तुमच्यावर खुश होतील. जोडीदारासोबत उत्तम क्षण घालवाल.

▪️कुंभ : कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. आहाराची पथ्ये पाळावीत. योग्य संधीची वाट पहावी.

▪️मीन : तब्येतीत सुधारणा संभवते. घरातील गोष्टीत रमून जाल. मुलांबाबतचे मतभेद दूर होतील.

Leave A Reply

Your email address will not be published.