Take a fresh look at your lifestyle.

नवरात्रोत्सव म्हणजे स्री शक्ती आणि धान्याचा सन्मान !

प्रत्येक हिंदुने हा सण साजरा केला पाहिजे.

कालपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरूवात झालीय. शरद ऋतुच्या प्रारंभी येणारा हा सण म्हणून शारदीय नवरात्र उत्सव. या सणात घटस्थापना केली जाते.शेतातुन नवीन आलेले धान्य या घटात ठेवून त्याची पुजा बांधली जाते.हा अन्नाचा सन्मान आहे. अन्नाला पुर्णब्रम्हाचा दर्जा दिला जातो.म्हणून ही ब्रम्हाची पुजा आहे.
पौराणिक उल्लेख आपणास माहिती असायला हवेत.

महिषासुर या राक्षसाने धुमाकूळ घातला होता.त्याला मारण्यासाठी देवांनी दुर्गामातेला साकडे घातले.तेव्हा नऊ दिवस युद्ध झाले ती रूपं अशी आहेत,
पहिल्या दिवशी शैलपुत्री देवी, दुसरा दिवस असतो तो ब्रम्हचारिणी देवीचा, तिसरा दिवस चंद्रघटा देवीचा मानण्यात येतो तर चौथा दिवस कुष्मांडा देवीची पूजा करण्यात येते. पाचवा दिवस स्कंदमाता देवी, सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा, सातवा दिवस हा कालरात्री देवीसाठी, आठव्या दिवशी महागौरी देवी आणि नववा दिवस हा सिद्धिदात्री देवीच्या रुपात युद्ध झाले म्हणून नऊ दिवस या देवींच्या पूजनाचा दिवस मानला जातो.दहाव्या दिवशी महिषासुराचा वध झाला तो दसरा सण आहे.
रामायणातही नवरात्रीचा उल्लेख आला आहे.प्रभु श्रीरामांनी शरद ऋतुच्या प्रारंभी युद्ध काळात नऊ दिवस भगवती देवीची उपासना केली आणि दहाव्या दिवशी रावणाचा वध केला तो दसरा सण होय.
सज्जनहो या नऊ दिवसांत घरामध्ये घटस्थापना केल्याने स्री सन्मानाचे महत्त्व अधोरेखित होते.अन्नधान्याचा सन्मान केला जातो.घरातील वातावरण सकारात्मक होऊन आनंद प्राप्त होतो.दुष्ट शक्तीवर सात्विक शक्तीने विजय मिळवता येतो हा या सणाचं संदेश आहे.हा स्री शक्तीचा जागर आहे. दहाव्या दिवशी रावण दहनासाठी आपण रामरुप होणं गरजेचं आहे.
रामकृष्णहरी