Take a fresh look at your lifestyle.

टाकळी खातगाव येथे वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू !

 तर एका जखमीवर भाळवणीत उपचार सुरू.

अहमदनगर : टाकळी खातगाव (ता.नगर) येथे जनावरे चारणाऱ्या शेतकऱ्यांवर वीज कोसळली. या दुर्घटनेमध्ये भानुदास बाबूराव शेटे (वय 72) हे जागीच ठार झाले. तर गणपत सखाराम पिसे (वय 75) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर भाळवणी (ता. पारनेर) येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
भानुदास शेटे आणि गणपत पिसे (रा. टाकळी खातगाव, ता. नगर) हे शेळ्या चारण्याचे काम करतात. दोघे ही नेहमीप्रमाणे गुरूवारी (दि.7) शेळ्या चारण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पाठीमागील राजमोहम्मद हसन शेख यांच्या गट नंबर 291 मध्ये गेले होते. सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला दुपारी साडे तीन वाजता सुरूवात झाली. त्यातच पावणे चार वाजण्याच्या सुमारास या भागात वीज कोसळून मोठा आवाज झाला. त्यामुळे या भागातील शेतकरी वीज कोठे कोसळली, हे पाहण्यासाठी गेले. त्यावेळेस भानुदास शेटे हे वीज कोसळून मृत्यूमुखी पडले होते. गणपत पिसे हे जखमी झाले होते. पिसे यांना उपचारासाठी भाळवणी (ता. पारनेर) येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.