Take a fresh look at your lifestyle.

शरद पवारांच्या जिवलग सहकाऱ्याचे निधन !

'त्यांनी' पवारांची काढली होती हत्तीवरून मिरवणूक.

 

इंदापूर : तालुक्यातील निमगाव केतकी येथील जगन्नाथराव मारुतीराव मोरे उर्फ ज. मा. मोरे (वय ८८) यांचे बुधवारी सकाळी सहा वाजता निधन झाले. पुणे शहरातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे जिवलग सहकारी म्हणून ते परिचित होते. ‘जमा आप्पा’ म्हणून त्यांना आदराने संबोधत असत.

मोरे यांनी तीन वेळा इंदापुर विधानसभा निवडणूक लढवली होती .मात्र ,काही मतांनी पराभूत व्हावे लागले होते. पवार यांनी स्थापन केलेल्या एस काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. इंदापूर तालुका पंचायत समितीचे सन ६२ ते ७२ दहा वर्ष सभापती म्हणून काम केले होते. त्यांच्या कारकिर्दीत गावासह तालुक्यात अनेक विकासकामे झाली. पवार कुटुंबाशी त्यांचे अंत्यत जिव्हाळ्याचे संबध होते. त्यांनी पवारांची गावातून हत्तीवरुन मिरवणूक काढली होती. त्यांच्या मागे मुलगा भारत, नातू समीर, सुना, नातवंडे, तीन भाऊ असा परिवार आहे

शरद पवारांकडून श्रध्दांजली अर्पण
”इंदापुर तालुक्यातील माझे धडाडीचे निष्ठावान सहकारी ज. मा.मोरे यांचे निधन मनाला चटका लावणारे आहे. जमांच्या शोकाकुल कुटुबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.
खा.शरद पवार
अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी
मोरे यांनी तीन वेळा इंदापुर विधानसभा निवडणूक लढवली होती .मात्र ,काही मतांनी पराभूत व्हावे लागले होते. पवार यांनी स्थापन केलेल्या एस काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. इंदापूर तालुका पंचायत समितीचे सन ६२ ते ७२ दहा वर्ष सभापती म्हणून काम केले होते. त्यांच्या कारकिर्दीत गावासह तालुक्यात अनेक विकासकामे झाली. पवार कुटुंबाशी त्यांचे अंत्यत जिव्हाळ्याचे संबध होते. त्यांनी पवारांची गावातून हत्तीवरुन मिरवणूक काढली होती. त्यांच्या मागे मुलगा भारत, नातू समीर, सुना, नातवंडे, तीन भाऊ असा परिवार आहे.

”ज.मा. आप्पा आम्हा सर्वांसाठी अतिशय मौल्यवान असा ठेवा होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष म्हणुन त्यांनी बजावलेली कामगिरी उल्लेखनीय आहे.त्यांच्या निधनामुळे आम्हा सर्वांचे मार्गदर्शक व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले. या दु:खद प्रसंगी मोरे कुटुंबियांसमवेत आहोत.
 खा.सुप्रिया सुळे
लोकसभा सदस्या