Take a fresh look at your lifestyle.

अजितदादा म्हणाले..! काय आज दुपारीच चंद्रावर गेलाय ?

भर कार्यक्रमस्थळी दारूडयाने केले असे काही...

 

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपला स्पष्टवक्तेपणा आणि रोखठोक स्वभावासाठी ओळखले जातात. त्यांच्या भाषणांमधून अनेकदा त्यांच्या स्वभावाची चुणूक पहायला मिळते. नुकतेच बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री पवार हे एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी तर चक्क एक दारुडाच अजित पवारांच्या पाया पडण्यासाठी आला. यावेळी पोलीस आणि इतरांना त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. अगदी दुपारच्या वेळी मद्यप्राशन केलेलं पाहून अजित पवारांनीही आपल्या शैलीत दुपारीच चंद्रावर, काय चाललंय काय? अशी विचारणा केली.

बारामती तालुक्यातील कटफळ येथे ड्रोनद्वारे भुमापण सर्वेक्षणास सुरुवात झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाची मोहिमेची सुरुवात झाली. यावेळी अजित पवार हे अधिकाऱ्यांकडून माहिती घेत असताना एक जण गर्दीतून वाट काढताना अजित पवार यांच्या पाया पडला.

मात्र तेवढ्यात सुरक्षारक्षकांनी आणि पोलिसांनी त्याला बाजूला काढले. त्यावर तो दारू पिलेला आहे, हे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी आज काय दुपारीच चंद्रावर गेलाय. अरे आज शनिवार आहे’ असे म्हटले. त्यानंतर भाषणादरम्यान गावातील एका कार्यकर्त्याने, ‘दादा, गावात दारू धंदे आहेत. दारूधंदे बंद करायला पोलिसांना सांगा’ अशी विचारणा केली.

त्यावर अजित पवार यांनी अधिकारी आहेत का? अशी विचारणा केली आणि माझ्या तालुक्यात असे धंदे नको अशी तंबी देखील दिली. आता अजित पवार यांच्या तंबीनंतर तरी गावातील धंदे बंद होतात का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.