Take a fresh look at your lifestyle.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्या : सरपंच प्रकाश गाजरे यांची मागणी !

 

पारनेर : तालुक्यात काही भागात जोरदार पाऊस झाल्यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यासंदर्भात म्हसोबा झापचे सरपंच प्रकाश गाजरे यांनी आमदार निलेश लंके व पारनेरचे तहसीलदार यांना निवेदन देत शेतीच्या झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.

पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर, कर्जुले हर्या, म्हसोबा झाप, सावरगाव, पोखरी, खडकवाडी, पळशी, वनकुटे, देसवडे, मांडवे खु., वडगाव सावताळ, वासुंदे या गावांमध्ये व परिसरात गेल्या आठवड्यामध्ये चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे काढणीला आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रशासनाने शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन झालेल्या पिकांची पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने म्हसोबा झापचे सरपंच प्रकाश गाजरे यांनी आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून तालुका कृषी प्रशासनाला केली आहे. सरपंच गाजरे यांच्या माध्यमातून शेतकरी सुशांत निमसे, बबन निमसे, पांडुरंग आहेर, बाळासाहेब शिंदे, अशोक आहेर, संजय आहेर, गणेश वाळुंज, अविनाश हांडे, जयराम आहेर यांनी आमदार निलेश लंके व तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.

दरम्यान गेल्या एक महिन्यापूर्वी तालुक्यातील वनकुटे, पळशी या भागांमध्येही जोरदार पाऊस झाला होता तसेच गेल्या आठवड्यात तालुक्याच्या उत्तर भागात चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्याचे काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसान भरपाई देऊन प्रशासनाने शेतकऱ्याला आता आधार देण्याची गरज आहे. नुकसान भरपाईची मागणी करत म्हसोबा झापचे सरपंच प्रकाश गाजरे यांनी शेतकऱ्यांच्या हिताची मागणी केली आहे.
तालुक्याच्या उत्तर भागातील गावांमध्ये गेल्या आठवड्यात मोठा पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्याची काढणीला आलेली पिके ही आता आडवी झाली आहेत. शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे प्रशासनाने पिकांची पाहणी करून त्वरित पंचनामा करत नुकसान भरपाई देऊन टाकळी ढोकेश्वर परिसरातील गावांमधील शेतकऱ्याला आधार द्यावा व शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी.
प्रकाश गाजरे
(सरपंच, म्हसोबाझाप)