Take a fresh look at your lifestyle.

दहावी पास झालेल्यांना थेट रेल्वेत नोकरी; जाणून घ्या सर्व काही! 

 

रेल्वे रिक्रूटमेंट सेल अप्रेंटिसच्या विविध विभागासाठी एकूण ६ हजार ८९१ पदांसाठी नोकर भरती करणार आहे. यात वेगवेगळ्या ट्रेड्सच्या जागा भरल्या जातील. याबद्दल आणखी माहिती जाणून घेऊयात…
पात्रता काय? : कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्डाच्या शाळेतून १० वी पास प्रमाणपत्र असणं बंधनकारक आहे. तसेच उमेदवाराकडे संबंधित क्षेत्रातील आयटीआयचं प्रमाणपत्र असावं.
वय आणि शुल्क : अर्ज भरण्यासाठी १०० रुपये शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावं लागेल. र्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १५ ते २४ या वयोगटातील असायला हवे.
निवड कशी होणार? : १० वी आणि आयटीआयमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे निवड करण्यात येईल. त्यानंतर उमेदवारांच्या निवडीची मेरिट लिस्ट लावली जाईल.
जागा आणि मुदत : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत विविध ट्रेड्ससाठी ४३२ जागा तर ईस्टर्न रेल्वेत ३ हजार ३६६ तर उत्तर रेल्वेत ३ हजार ९३ जागांसाठी ही भरती होणार आहे. सर्व भरती ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागवण्यात आले आहेत. ज्यात ४३२ पदांसाठी १० ऑक्टोबर, ३ हजार ९३ पदांसाठी २० ऑक्टोबर २०२१, तर ३ हजार ३६६ पदांसाठी ३ नोव्हेंबर २०२१ या अंतिम तारखेपर्यंत अर्ज भरता येतील.

इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी apprenticeshipindia.org या वेबसाईटवर भेट द्यावी. निवड झालेल्या उमेदवारांना अप्रेंटिसशिपच्या काळात सॅलरी, स्टाइपेंड देण्यात येणार आहे.