Take a fresh look at your lifestyle.

घटस्थापनेचा विधी, शुभमुहूर्त, आणि फायदे!

 

आज गुरुवारपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे. यंदा कोणता सुमुहूर्त आहे आणि यथायोग्य विधी काय आहे? याबाबत जाणून घेऊया…
घटस्थापना मुहूर्त काय? : उद्या ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजून १७ मिनिट ते सकाळी १० वाजून १७ मिनिटापर्यंत घटस्थापना करू शकता. मात्र जर या वेळेत घटस्थापना शक्य नसेल, तर सकाळी ११ वाजून ५२ मिनिट ते १२ वाजून ३८ मिनिटांच्या पर्यायी मुहुर्तावर घटस्थापना करा.
जाणून घ्या घटस्थापनेचा विधी :
● घटबसते वेळी देवीची पूजा करा. पूजा केलेला टाक घ्यावा. अभिषेक करून नंतर स्थापना करावी.
● स्थापना करण्यापूर्वी सर्वात अगोदर पाट घ्या. त्यावर गहू पसरून पाण्याने भरलेला कलश ठेवा.
● पाण्यात पैसे, सुपारी घाला. तांब्यावर गव्हाने भरलेले लहान ताम्हन ठेवून त्यात देवीचा टाक ठेवावा.
● हळद-कुंकू गंध, फुल यांनी पूजा करा. या दिवशी गव्हाचे महत्त्व जास्त असल्याने पाटापुढे शंख, घंटा ठेवा.
● खाली पत्रावळ ठेवून पत्रावळीवर चाळलेली काळी माती टाकून गहू, पुन्हा माती, पुन्हा गहू पेरा. हे दोन तीन वेळा करा. मध्ये पेल्यासारखे भांडे ठेवून त्यांची पूजा करा.
● यात पाणी, हळद, कुंकू वाहून फुलांची माळ करून त्यावर सोडा. कलशाची पूजा करा.
● पाटावर रांगोळी काढा. कारळ्याच्या फुलांची किंवा झेंडुच्या फुलांची माळ करा. ही फुले मिळाली नाहीत, तर अन्य कोणत्याही सुवासिक फुलांची माळ नवरात्रीत नऊ दिवस घटावर रोज एक याप्रमाणे बांधा.
● नवरात्रीत नऊ दिवस चोवीस तास समई तेवत ठेवा. ज्या दिवशी एका तिथीचा क्षय असेल त्या दिवशी दोन वेळा माळा घालून नऊ दिवसांच्या माळा पूर्ण करा.
● रोज आपण फराळाचे जिन्नस करतो, त्यांचा नैवेद्य दाखवून नंतर फराळ करा. रोज सायंकाळी देवीची आरती, जप, पोथीवाचन करा.
घटस्थापनेचे फायदे काय? :
● घट हा पंचमहाभूतांचे प्रतीक असून ही पंचमहाभूते म्हणजे पृथ्वी, जल, आप, तेज आणि वायू.
● या निमित्ताने आपण पंचमहाभूतात वसलेल्या देवांना आपल्या घरात येण्याचे आमंत्रण देतो.
● चराचरात सामावलेली ऊर्जा घटस्थापनेमुळे आपल्या घरात एकवटते आणि त्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावाने वास्तुदोष दूर होतात.
● घरात शांतता नांदते. देवीच्या आगमनाबरोबर घरात नवचैतन्य, उत्साह, ऊर्जेचा समावेश होतो.