Take a fresh look at your lifestyle.

आमदार निलेश लंकेंच्या प्रयत्नातून १ कोटी २१ लाखांच्या कामांना मंजुरी !

पारनेर : लोकप्रनिधींनींना मतदासंघातील विविध विकास कामे करण्यासाठी त्यांच्या मर्जीने निधी देता यावा यासाठी देण्यात येणाऱ्या स्थानिक विकास निधीमधून विविध गावांमध्ये १ कोटी २१ लाख रूपयांची कामे मंजुर करण्यात आल्याची माहीती आमदार निलेश लंके यांनी दिली. 
गांजीभोयरे येथे कानिफनाथ मंदीरासमोरील सामाजिक सभागृह बांधण्यासाठी १५ लाख, पिंपरीजलसेनच्या काळूबाई मंदीरासमोरील सामाजिक सभागृहासाठी १० लाख, सिध्देश्‍वरवाडी येथील हनुमान मंदीरासमोरील सामाजिक सभागृहासाठी १० लाख, हत्तलखिंडी येथील ग्रामपंचायत जागेत सामाजिक सभागृह बांधण्यासाठी १० लाख, टाकळीढोकश्‍वर येथे जिल्हा मराठा समाज संस्थेच्या विद्यालयास जोडणारा रस्ता करण्यासाठी २० लाख, नवनागापूर येथे चेतना कालनी विठठल मंदीर सभागृह बांधण्यासाठी १० लाख, पिंपळगांव वाघा येथे विठठल मंदीर सामाजिक सभागृह बांधण्यासाठी १० लाख, म्हस्केवाडी येथे गणेश मंदीर जागेत सामाजिक सभागृह बांधण्यासाठी १५ लाख, लोणीमावळा येथील मुक्ताई मंदिरासमोर सामाजिक सभागृह बांधण्यासाठी १५ लाख, वारणवाडी येथे वारणवाडी ते पट रस्ता करणे या कामासाठी ६ लाख रूपयांचा निधी मंजुर करण्यात आल्याचे आ. लंके म्हणाले.
आ. लंके म्हणाले, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी कोरोनाचे संकट असतानाही अर्थसंकल्पामध्ये मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी भरीव निधीची तरतूद केली असून सुमारे १०० कोटी रूपये खर्चाची कामे सध्या मतदारसंघात सुरू आहेत. मतदारसंघाचा सर्वागिण विकास करण्याच्या हेतूने कोणताही राजकिय अभिनिवेश न ठेवता सर्व गावांना समान न्याय देण्याचे आपले धोरण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.