Take a fresh look at your lifestyle.

दु:खद घटना : राष्ट्रवादीच्या आमदारांचे निष्ठावान समर्थक निर्वतले !

शिरुर : शिरूर नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष अकबरभाई बागवान यांचे अल्पशा आजाराने आज दु:खद निधन झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते निष्ठावंत कार्यकर्ते होते तर शिरूर – हवेलीचे आमदार अशोक पवार यांचे ते कट्टर समर्थक होते. 
शिरूर तालुका विद्युत वितरण नियंत्रण समिती सदस्य हाफीजभाई बागवान यांचे ते वडील होत. शिरूर शहराच्या विकासासाठी त्यांची तळमळ होती. नगरसेवक असताना त्याच्या प्रभागातील अनेक कामे त्यांनी मार्गी लावली होती. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे त्यांचा शहरात मोठा मित्र परिवार होता. त्यामुळे त्यांच्या निधनाची बातमी अनेकांना चटका लावून गेली. शहरातील प्रसिद्ध A-1 ग्रुपचे ते संस्थापक होते.वाढदिवसानिमित्त लागणारे केक बनविण्याचा त्यांचा व्यवसाय आहे.
दोन वर्षांपूर्वी त्यांनी आमदार अशोक पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भला मोठा केक बनविला होता. एका टेंपोमधून हा केक त्यांनी वडगाव रासाई येथे पाठविल्यानंतर त्यावेळी अनेक कार्यकर्ते मंडळींनी अकबरभाई यांचे अभिनंदन केले होते. आज आमदार अशोक पवार यांनी या आठवणींना उजाळा दिला. एक खंदा समर्थक गमविल्याची भावना आमदार अशोक पवार यांनी व्यक्त केली. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत आज दुपारी त्यांच्या अंतीम संस्काराचा विधी पार पडला.