Take a fresh look at your lifestyle.

नामांकित कंपन्यांमधील जॉबसाठी पारनेर महाविद्यालयात ‘जॉब फेअर’चे यशस्वी आयोजन.

0
पारनेर : जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे,सचिव जी.डी.खानदेशे व इतर पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली न्यू आर्ट्स, कॉमर्स अँण्ड सायन्स कॉलेज पारनेर आणि करिअर अॅकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने न्यू आर्टस् कॉमर्स अँण्ड सायन्स कॉलेज,पारनेर महाविद्यालयात दि. 22 आणि 23 सप्टेंबर रोजी जॉब फेअर आयोजित केला गेला. यामध्ये विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी सहभाग नोंदविला.या जॉब फेअरमध्ये कला, वाणिज्य, विज्ञान व इतर विविध शाखेतील विद्यार्थ्यांनी मोठया प्रमाणात सहभाग नोंदवला.या जॉब फेअरमध्ये २९८ विद्यार्थी सहभागी झाले होते. या जॉब फेअरला विद्यार्थ्यांकडून उत्कृष्ठ प्रतिसाद मिळला.
जॉब फेअरमध्ये जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. नाशिक, बारामती, सातारा, सांगली,पुणे, नगर, शेवगाव, श्रीगोंदा, या व अशा विविध ठिकाणाहून विद्यार्थी सहभागी झाले होते.
तळागाळातील विद्यार्थ्यांना उत्तम प्रतीचे शिक्षण मिळावे, त्यांना उज्ज्वल भवितव्याची स्वप्ने साकार करता यावीत या उदात्त हेतूने महाविद्यालयाची वाटचाल यशस्वीपणे चालू आहे.महाविद्यालयात ग्रामीण भागातील साडेतीन हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत बी.ए.,बी.कॉम.बी.एस.सी. बी. कॉम.एम कॉम, एम.एस.सी. या अभ्यासक्रमांबरोबरच महाविद्यालमध्ये बी.बी.ए, सी.ए, बी एस सी कॉम्प्युटर हे अभ्यासक्रमसुद्धा नव्याने शिकविले जातात.पदव्युत्तर शिक्षणानंतर महाविद्यालयात संशोधन केंद्रही उपलब्ध आहेत.
शिक्षणाबरोबरच एक सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून महाविद्यालय दरवर्षी जॉब फेअरचे आयोजन करत असते.यामध्ये केमिकल, फार्मा, इलेक्ट्रिकल, आयटी कंपन्या सहभाग नोंदवत असतात.महाविद्यालयाचे विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत.कोरोना काळात वाढलेली बेरोजगारी, बंद पडलेले उद्योगधंदे यामुळे तरुण वर्गामध्ये नैराश्य न येता त्यांना नोकरीच्या उत्तम संधी मिळाव्यात यासाठी या वर्षी महाविद्यालयाने सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी जॉब फेअरचे आयोजन केले.
यामध्ये पारंपरिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबरच आयटी.आय, डिप्लोमा, इंजिनिअरिंग,फार्मा, नर्सिंग, बायोटेक्नॉलॉजी या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.या जॉब फेअरमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतल्यामुळे अनेक गुणवान व होतकरू विद्यार्थ्यांना या जॉबफेअरचा खूप चांगला उपयोग झालेला आहे असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर, उपप्राचार्य डॉ. दिलीप ठुबे यांनी सांगितले.या जॉब फेअरचे यशस्वी आयोजन प्रा.रमेश खराडे,प्रा.रणजित शिंदे, प्रा. सागर म्हस्के, डॉ.भिमराज काकडे यांनी केले.
Leave A Reply

Your email address will not be published.