Take a fresh look at your lifestyle.

‘नाथबाबा’चा जामीन फेटाळला; मनोहर मामाच्या अडचणीत वाढ !

 

बारामती: अंधश्रद्धा निर्मूलन विरोधी कायद्यात गुन्हा दाखल झालेल्या मनोहर भोसले याच्या अटकेनंतर विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा याने दाखल केलेला अटकपूर्व जामीन आज बारामतीच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळला.
विशाल वाघमारे यांच्या वतीने अटक पूर्व जामीन मांडला होता त्याची सुनावणी न्यायाधीश एस.टी. भालेराव यांच्यासमोर झाली. यामध्ये फिर्यादी शशिकांत खरात यांच्या वतीने ऍडवोकेट प्रसाद खारतोडे, प्रीती शिंदे व प्रतिमा भरणे यांनी युक्तिवाद केला. सरकारी वकील एडवोकेट ज्ञानदेव शिंगाडे यांनी ही बाजू मांडली. हा सर्व गुन्हा अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कायद्याच्या विरोधात असून यातून समाजाचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे यातील प्रमुख सूत्रधारासह सहआरोपी असलेला विशाल वाघमारे याचा तपास देखील यामध्ये अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे त्याला अटकपूर्व जामीन मंजूर करू नये असा युक्तिवाद या वकिलांनी केला.
त्याचबरोबर सरकारी वकील ऍड. ज्ञानदेव शिंगाडे, यांनीदेखील अटकपूर्व जामीनास विरोध केला. दोन्ही बचाव पक्षाचा व सरकारी पक्षाचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरला व विशाल वाघमारे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला. त्यामुळे विशाल वाघमारे यांच्यापुढील अडचणी वाढल्या असून एकंदरीत मनोहर भोसले याच्या विरोधातील देखील अडचणी वाढल्या आहेत.
गुन्हा दाखल झाल्यापासून विशाल वाघमारे हा फरार आहे. विशाल वाघमारे याच्याकडे मनोहर भोसले याच्याशी संबंधित आर्थिक प्रकरणातील सर्व जबाबदारी होती. त्यामुळे त्याच्याकडील माहिती अत्यंत महत्त्वाची असून त्यांची अटक महत्त्वाची आहे. आता त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला असल्याने पोलीस काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.