Take a fresh look at your lifestyle.

मांडव्यातील ‘त्यांना’ मिळाला ‘निर्माल्य’चा आधार !

 

पारनेर : समाजातील अंध,मूकबधिर अस्थिव्यंग,शारीरिक दृष्ट्या दुर्बल पुरुष व महिलांसाठी कार्य करणाऱ्या निर्माल्य ट्रस्ट या संस्थेअंतर्गत तालुक्यातील मांडवे खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, पाटी-पेन्सिल,पेन इत्यादी वस्तूंचे वाटप करण्यात आले.
तसेच अपंग विद्यार्थ्यांच्या कुटुंबांसाठी किराणा-धान्य, त्याच बरोबर आदिवासींयासाठी अत्यावश्यक कपड्यांचे वाटप करण्यात आले,कार्यक्रमास गावातील ग्रामस्थ,ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच हिरा गागरे,शाळा समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव, मुख्याध्यापिका तरटे, निर्माल्य ट्रस्टच्या सुप्रिया मंडलिक मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.निर्माल्य ट्रस्ट संस्थेच्या वतीने सुप्रिया मंडलिक यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.
संस्थेचे संस्थापक मीना आणि अजित बेदरकर हे दाम्पत्य 2003 पासून संपूर्ण महाराष्ट्रभर समाजातील वंचित आणि दुर्बल घटकांसाठी अहोरात्र कार्य करत आहेत,निर्माल्य ट्रस्ट ही संस्था खास करून समाजातील दिव्यांग व्यक्तींच्या गरजेनुसार विशेष काम करत आहे,कोराना सारख्या महामारीच्या काळात या संस्थेअंतर्गत तालुक्यातील खेडोपाड्यात किराणा,धान्य व कपडे अशा विविध अत्यावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या वेळी नेहमीप्रमाणे गणेश औटी यांचे मोलाचे सहकार्य लाभले, तसेच संदीप झावरे, उपसरपंच गागरे आदींनी संस्थेच्या कामाबद्दल कौतुक व आभार व्यक्त केले.