Take a fresh look at your lifestyle.

…अन् शिवसेना हळदीच्या अंगाने पळून गेली !

सदाभाऊ खोतांचा मार्मिक टोला.

पुणे : भाजपबरोबर पक्क ठरलेलं लग्न, साखरपुड्यासकट मोडून हळदीच्या अंगाने शिवसेना पळून गेली‘असे मार्मिक विधान माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून खोत सातत्याने महाविकास आघाडी सरकारवर टिकास्त्र सोडीत आहेत. प्रामुख्याने राष्ट्रवादी, आणि पवार कुटुंबावर टिका करणारे खोत यांनी शिवसेनेवर कधी टिका केली नव्हती मात्र, त्यांनी आता थेट शिवसेनेशी पंगा घेतला आहे. शिवसेना सदाभाऊ यांच्या या टीकेला कसे उत्तर देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सदाभाऊ खोत यांनी शिवसेना-भाजप युतीमध्ये कृषिराज्यमंत्री म्हणून काम केले आहे, शिवसेनेच्या नेत्यांशी सुद्धा त्यांचे चांगले संबंध आहेत मात्र या टीकेमुळे शिवसेना आणि त्यांच्यातील संबंध बिघडण्याचीच शक्यता आहे.