Take a fresh look at your lifestyle.

एसबीआयमध्ये २०५६ पदांसाठी मोठी भरती!

कोणत्याही विषयातील पदवीधारकांना संधी.

 

एसबीआयने पात्र उमेदवारांकडून एकूण २०५६ पदांसाठी अर्ज मागवले आहे. इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज करण्याची मुदत २५ ऑक्टोबर २०२१ आहे. एसबीआय पीओ २०२१ अर्जादरम्यान, उमेदवारांना ७५० रुपये विहित अर्ज शुल्क ऑनलाईन भरावे लागेल.
इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा इतर कोणत्याही उच्च शिक्षण संस्थेतून कोणत्याही विषयात पदवी उत्तीर्ण केलेली असावी. उमेदवारांचे वय १ एप्रिल २०२१ रोजी २१ वर्षांपेक्षा कमी आणि ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे. शासकीय नियमांनुसार वरच्या वयोमर्यादेत आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शिथिलता दिली जाईल.
इच्छुक उमेदवारांनी https://sbi.co.in/ भेट द्यावी. करिअर विभागात जाऊन अर्ज प्रक्रियेअंतर्गत, प्रथम नोंदणी करा. यानंतर दिलेल्या नोंदणी क्रमांक आणि पासवर्डच्या मदतीने लॉग इन करून, आपला अर्ज सादर करा.