Take a fresh look at your lifestyle.

‘या’ तरुणाच्या एका अजब लग्नाची गजब गोष्ट !

नातेवाईकांच्या उपस्थितीत घडले असे काही...वाचाच! 

झारखंडच्या लोहरदगा भागात एक अशी घटना घडलीय. याबाबत यापूर्वी कधीच ऐकले नसेल. येथील एका तरुणाने सर्व नातेवाईकांच्या उपस्थितीत एकाच वेळी दोन तरुणींशी लग्न केलं आहे. त्याहून विशेष सांगायची बाब म्हणजे या तिघांचीही मुलं या लग्नसोहळ्याला आवर्जून हजर होती. या तरुणाचे नाव आहे संजीत उरांव. 
सविस्तर असे कि, संजीतचं दोन तरुणींवर प्रेम होतं. लग्न होण्यापूर्वीच त्याला या दोन्ही तरुणींपासून मुलंही झाल्याने हे प्रकरण पोलिसांतही गेलं होतं. मात्र यावर कुठलाही सर्वमान्य आणि कायदेशीर तोडगा निघत नव्हता. अखेर गावच्या पंचायतीत यावर खल झाला आणि तरुणाने दोन्ही तरुणींसोबत लग्न करावं, असं निश्चित करण्यात आलं.
यानंतर या तरुणाला आणि दोन्ही तरुणींनाही हा तोडगा मान्य झाला. पुढे तिघांचं थाटामाटात लग्न लावण्यात आलं.
संजीतचं रिंकी उरांव नावाच्या तरुणीवर अनेक वर्षांपूर्वी प्रेम जडलं होतं. लग्नापूर्वीच त्यांना तीन मुलं झाली होती. तर तीन वर्षांपासून संजीतचं कलावती उरांव नावाच्या तरुणीसोबतही प्रेमप्रकरण सुरू झालं. तिच्यापासून त्याला एक मुलगा होता. मात्र दोघींपैकी एकीसोबत लग्न करण्याचा पर्याय निवडायला संजीत तयार होत नव्हता. दोघींनाही मुलं असल्यामुळे आपलं संजीतशी लग्न व्हावं, यासाठी त्या आग्रह धरत होत्या.
आपकी अपनी ऑनलाइन दुकान खोलना अब हो गया है बहुत ही आसान और सस्ता भी। 

सिर्फ़ ४९९ रुपए में आप अपने ख़्वाबोंको हक़ीक़त में बदल सकते हैं। 

आज ही www.apptmart.com पे रेजिस्टर कीजिये और एक क़दम सफलता की ओर उठायिये।

अधिक जानकारी के लिए आज ही सम्पर्क करें +91 70286 32421
संजीतचं दोघींवरही प्रेम असल्यामुळे आपल्या आईवडिलांच्या लग्नाला तिघांचीही मुलं उपस्थित होती. एकमेकांसोबत खेळत ती धमाल करत होती. मात्र या अनोख्या लग्नाची चर्चा चांगलीच रंगली होती.