Take a fresh look at your lifestyle.

काल रात्री व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक इंस्टाग्राम का झाले होते बंद?

सर्व सेवा बंद होण्याचे कारण म्हणजे...

 

 

 

भारतीय वेळेनुसार रात्री 9 नंतर जगभरातील फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि इंस्टाग्राम सर्व्हर डाऊनमुळे काम करणे बंद झाले होते. जवळपास 6 तासांहून अधिक काळ बंद राहिल्यानंतर फेसबुक आणि इन्स्टाग्राम भारतीय वेळेनुसार पहाटे 3:24 वाजता तर व्हॉट्सअ‍ॅपने 4:19 वाजता काम सुरू केले. मात्र व्हॉट्सअ‍ॅप, इंस्टाग्राम का झाले होते बंद? याचे कारण आता समोर आले आहे.

फेसबुक, इंस्टग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅप हे फेसबुकच्या मालकीचे असल्याने तिघांचे सर्व्हर एकमेकांशी जोडलेले आहेत. याच कारणामुळे तिघांची सेवा बंद झाली होती. फेसबुकच्या सर्व्हरमध्ये झालेल्या बदलामुळे ही समस्या निर्माण झाल्याचे समोर येत आहे. मात्र, ठोस कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सर्व सेवा बंद होण्याचे कारण म्हणजे फेसबुकच्या डीएनएस (DNS) अर्थात डोमेन नेम सिस्टीमचे अपयश होते. DNS फेल झाल्याने फेसबुकमध्ये प्रवेश करण्यासाठी इंटरनेट ‘रूट’ अडथळा आणला गेला. कारण DNS कोणत्याही वेबसाईटला IP पत्त्यामध्ये अनुवादित करून यूजरला पेज उघडण्याच्या पृष्ठावर घेऊन जाते.

DNS फेल कशामुळे झाले? : तज्ज्ञांच्या अंदाजानुसार फेसबुकचे सर्व BGP (Border Gateway Protocol) थांबले होते, ज्यामुळे डीएनएस अयशस्वी झाले. ते फक्त BGP ‘मार्ग’च्या मदतीने आपले कार्य करते. तथापि, BGP थांबण्यामागची नक्की कारण अद्याप अधिकृतपणे समोर आलेले नाही.

या बंदचा फेसबुकच्या अधिकाऱ्यांना फटका बसला. कारण तेव्हा त्यांच्या कार्यालयातील अधिकृत मेल सिस्टीम आणि कर्मचाऱ्यांच्या प्रवेश कार्डांनीही काम करणे बंद केले होते. अशात लॉक केलेल्या सर्व्हरला मॅन्युअली रीसेट करण्यासाठी फेसबुकने कॅलिफोर्नियातील सांता क्लारा डेटा सेंटरला एक टीम पाठवली, परंतु अंतर्गत मेल सिस्टीम बंद झालायेन कर्मचाऱ्यांना प्रवेश करता आला नाही. मग त्यातून सुटका करण्याचा मार्ग नसल्याने टीम लॉक तोडून सर्व्हर रूममध्ये गेली आणि सर्व्हर ठीक केला.