Take a fresh look at your lifestyle.

करुणा शर्मा थेट परळीत दाखल मात्र, घडले वेगळेच काही…

धनंजय मुंडेंचे पुरावे सादर करणार होत्या पण..

 

परळी (बीड)- गेल्या अनेक महिन्यांपासून तसेच गेल्या दोन-तीन दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोप करणाऱ्या करुणा शर्मा यांनी आज थेट परळी गाठले. परळीत आपण पत्रकार परिषद घेऊन पुरावे जाहीर करणार असल्याचे त्यांनी या आधीच जाहीर केले होते. आज त्यानुसार करुणा शर्मा परळीत दाखल झाल्या, मात्र यावेळी परळी पोलिसांना त्यांच्या कारमध्ये एक पिस्तुल आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी पिस्तुल ताब्यात घेत करून शर्मा यांची चौकशी सुरू केली आहे.

▪️नागरिक संतप्त,महिलांनी केली शर्मांच्या अटकेची मागणी-

सदर प्रकार परळीत समजताच मंत्री धनंजय मुंडे समर्थक मोठ्या संख्येने जमा झाले. यात महिलावर्गही मोठ्या संख्येने जमला होता. हा जमलेला संतप्त जमाव करुणा शर्मांच्या अटकेची मागणी करत होता.

▪️करुणा शर्मांमुळे जीविताला धोका!

करुणा शर्मां यांच्याकडून आपल्या जीविताला धोका असल्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी विविध माध्यमातून स्पष्ट केले आहे. त्यामुळे आज करुणा शर्मा पत्रकार परिषदेसाठी आलेल्या असताना त्यांच्याकडे पिस्तुल का होते ? याबद्दल आता चर्चा सुरू झाली असून मुंडे परिवाराला त्यांच्याकडून घातपाताची शक्यता मुंडे समर्थक व्यक्त करत आहेत.