Take a fresh look at your lifestyle.

पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी साधला अण्णा हजारेंशी संवाद !

'अण्णा तुमची तब्बेत कशी आहे ?' केली विचारपूस.

✒️ सतीश डोंगरे 
शिरूर : शिरूर येथे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेल्या पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी मोबाईलवरून व्हिडिओ कॉल करून संवाद साधला व तब्येतीची विचारपूस केली.
एमपीएससी परीक्षेत दैदीप्यमान यश मिळविलेल्या पिंपळे धुमाळ येथील प्रतिक धुमाळ याच्यासह चार विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम कृष्णप्रकाश यांच्या शुभहस्ते आयोजित केला होता. सत्काराच्या कार्यक्रमानंतर कृष्णप्रकाश यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. बाबुराव नगर येथील ज्ञानसागर क्लासेस मध्ये हा कार्यक्रम पार पडला.आबासाहेब सोनवणे व सर्व मित्र परिवाराच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
हा कार्यक्रम संपल्यानंतर हजारे यांचे माजी स्वीय सहायक दत्ता आवारी यांनी कृष्णप्रकाश आणि अण्णा हजारे यांच्यात मोबाईलद्वारे संवाद घडवून आणला. ‘अण्णा तब्येत कशी आहे ? 23 तारखेनंतर मी तुम्हाला भेटायला येतोय. अण्णा तुमच्यात ईश्वराचा अंश आहे त्याचा अनुभव मला आला.’ असे कृष्णप्रकाश यांनी अण्णा हजारे यांच्याशी संवाद साधताना म्हटले.
नगरचे जिल्हा पोलिस अधीक्षक असताना कृष्णप्रकाश अनेकदा अण्णा हजारे यांच्या भेटीसाठी राळेगण येथे येत होते. परंतु नगर येथून बदली झाल्यानंतर त्यांचा राळेगणसिद्धी आणि अण्णा हजारे यांच्याशी संपर्क कमी झाला त्यामुळे शिरूर येथे आल्यानंतर कृष्णप्रकाश यांनी अण्णा हजारे यांच्याशी मोबाईलद्वारे संवाद साधत तब्येतीची विचारपूस केली.