Take a fresh look at your lifestyle.

अजित पवार म्हणाले,मला असल्या लोकांविषयी काहीही बोलायचे नाही !

मी नियमाने वागणारा माणूस आहे.

 

सातारा : जरंडेश्वर साखर कारखाना घोटाळाप्रकरणी भाजपा नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे नेते,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आरोप केले होते. यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खटाव येथील मेळाव्यानंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
मला असल्या लोकांविषयी काहीही बोलायचे नाही. संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की, मी नियमाने वागणारा माणूस आहे, असेही अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
सोमय्या रोज काही ना काही आरोप करत असतात. मात्र, त्यांच्या आरोपाला उत्तर देणे गरजेचे वाटत नाही. कारण मी विकासकामांना अधिक प्राधान्य देतो.
सहकारी साखर कारखाने आणि सहकारी संस्था या नको त्या व्यक्तींकडे गेल्या आहेत. ते चांगल्या विचारांच्या लोकांना द्या. तसेच सहकारात राजकारण शिरल्यामुळे सहकार मोडीत निघाला, असे सांगून व्यापारी दृष्टिकोनाला हरताळ फासल्यामुळेच सहकार चळवळ मोडीत निघायला सुरुवात झाली आहे, असे अजित पवारांनी म्हटले आहे. दरम्यान, 65 कोटीत खरेदी केलेल्या कारखान्याने 700 कोटींचे कर्ज घेतले असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता.

👉 Sureshot call with proper level
👉All call are above level,you have a much time to Execute Trades with discipline
👉Whats app- https://wa.me/+919960400609
👉Telegram – https://t.me/surestocks1
👉 Free Demat acc
Upstox-https://upstox.com/open-account/?f=3TACBA
Fyers –https://partners.fyers.in/AP0811