Take a fresh look at your lifestyle.

आपल्या दातांवर डाग का पडतात? 

वाचा,कशी राखावी निगा ! 

अनेकदा व्यवस्थित ब्रश करूनही आपले पांढरे शुभ्र दात हळूहळू पिवळे पडू लागतात आणि कालांतराने काळपट दिसू लागतात. जर अशात दातांची योग्य काळजी घेतली नाही तर दातांच्या रंगावर आणखी परिणाम होऊ लागतो. यासाठी खालील गोष्टी करा… 
● दातावर डाग पडण्याचं मुख्य कारण म्हणजे खाण्या-पिण्याच्या सवयी. सफरचंद, बटाटे, शीतपेय, चहा, कॉफी आणि मद्यामुळे तोंडातली पीएचची पातळी बिघडते आणि दातांवर डाग पडू लागतात.
● अनेकदा तोंड आणि दातांशी संबंधित विकारांमुळे, त्यावरच्या उपचारांमुळे दातांचा रंग उडू शकतो. गरोदर स्त्रीला जंतूसंसर्गाची लागण झाली तर तिच्या होणार्‍या बाळाच्या दातांच्या रंगावर याचा परिणाम होऊ शकतो.

● जर दातांचा नैसर्गिक रंग टिकवून ठेवायचा असेल तर दिवसातून दोन वेळा दात घासायला हवे. खाल्ल्यानंतर चूळ भरा.
● फ्लोराईडचे प्रमाण जास्त असलेली टूथपेस्ट किंवा पाण्याचा वापर केल्याने दातांचा पांढरा रंग फिका होऊ लागतो. यामुळे फ्लोरोसिस नावाचा विकार होतो. यामुळे दात पिवळट करडे दिसू लागतात. त्यांची झीज होते.
● कधी-कधी औषधांमुळेही दातांवर परिणाम होतो. बेनेड्रिल, प्रतिजैविकं आणि उच्च रक्तदाबावरच्या साध्या औषधांमुळे दात पिवळे पडतात.
● अनेकदावाढते वय दातांवर परिणाम करू लागते. वाढत्या वयात दातांवरच्या एनामलचा थर कमी होतो.
● धूम्रपान आणि मद्यपान करणार्‍या ज्येष्ठ नागरिकांना दात पिवळे पडण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो.
● आजार किंवा जंतूसंसर्गामुळे तोंडातल्या लाळेची निर्मिती कमी प्रमाणात होत असेल तर दातांवर डाग पडू शकतात.
वरील सर्व बाबींचा विचार करता जीवनशैलीत बदल करून, तोंडाचं आरोग्य राखून दातांवरच्या डागांची समस्या कमी करता येऊ शकतात.