वैज्ञानिकांनी त्याचा भविष्यात होणारा परिणाम तपासला आणि सिध्दांत निर्माण केला यामुळे कॅन्सर होईल.त्यात कधीच बदल होणार नाही.
तसंच संतांनी भगवंताशी भक्ताचं अनुसंधान हे सिध्द पुरुषांच्या मार्गदर्शनाने व्हाव असं नमुद केलं आहे. म्हणजेच जीवनात सदगुरुंचं आगमन व्हायला हवं.आपण कृपेला पात्र होणं हे या अनुसंधानात अपेक्षित आहेच.
चंचलता त्याशिवाय नाहिशी होत नाही, द्वैत त्याखेरीज नाहीसे होत नाही.
सध्या वैश्विक महामारीचा काळ सुरू आहे. दिवसभरात एकदा तरी हा विचार मनात येईलच,मला आजार होणार नाही ना?
मनोविचारांचं अस्थैर्य या विचार श्रुंखला सतत सुरू ठेवत असतं आणि आम्हाला अस्वस्थतेकडे घेऊन जातं.सदगुरूंच्या कृपाप्रसादाने नामस्मरण चांगल्या पद्धतीने करता येते आणि दोलायमान स्थितीतुन बाहेर पडता येते.जवळ पाण्याची बाटली असली की तहान लागण्याची चिंता वाटत नाही, इतकं ते सहज आहे. मृत्यू जवळच आहे, तो दुरवर नाही मग घाबरणार तरी किती काळ?
आपल्याकडे एखाद्या जादुगाराने नाग असलेली बंद टोपली हातात दिल्यावर काय होईल ?
नेमकी ही अस्वस्थता टाळायचा प्रयत्न फसतो आहे. म्हणून सदगुरुंच्या कृपेचे वैधानिक अनुसंधान अत्यावश्यक आहे.
पुढे काय होईल याची प्रचिती गुरू देईल आणि मग आपोआप चिंता,भिती नाहिशी होऊन नामचिंतन घडेल आणि मनोस्थैर्य लाभेल.