Take a fresh look at your lifestyle.

📌 आजचे 12 राशींचे राशिभविष्य

🔸 5 ऑक्टोबर 2021 

0
▪️मेष : आज टाकलेले पाऊल मागे घेऊ नका. गुरुतुल्य व्यक्तीकडून प्रेरणा मिळेल. घाईने कामे उरकू नका. सहकार्‍यांच्या हातात हात घालून चला.
▪️वृषभ : कामे गतीने पूर्णत्वास जातील. मेहनतीचे योग्य फळ मिळेल. दिवस उर्जावर्धक राहील. कष्टाला पर्याय नाही.
▪️मिथुन : जवळचा प्रवास चांगला राहील. कामाचा अधिक भार येऊ शकतो. खाण्यापिण्याची चंगळ राहील.
▪️कर्क : हातातील अधिकार योग्य वेळी वापरा. नातेवाईकांची गाठ पडेल. चटपटीत पदार्थ खाल.
▪️सिंह : भावंडांचे सहकार्य लाभेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. व्यायामाचा कंटाळा करू नका.
▪️कन्या : नियोजनबद्ध कामे कराल. आवडीची कामे करण्यावर भर द्याल. मनातील निराशाजनक विचार काढून टाका.
▪️तूळ : कौटुंबिक खर्च निघतील. कामाची क्रमवारी ठरवा. बोलण्यातून लोकांवरती प्रभाव पाडाल. झोपेची तक्रार जाणवेल. समस्यांना संयमाने तोंड द्या.
▪️वृश्चिक : अधिकार्‍यांच्या सल्ल्याने वागा. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. फक्त कामावरच लक्ष केंद्रित करा.
▪️धनु : कौटुंबिक वातावरण शांत ठेवावे. परोपकाराची भावना जोपासाल. तरुणांच्या सहवासात रमाल.
▪️मकर : गरज नसेल तर प्रवास टाळावा. कमिशन च्या व्यवसायात चांगली कमाई कराल. धार्मिक भावना वाढीस लागेल.
▪️कुंभ : आरोग्याची काळजी घ्या. जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभेल. तिखट शब्दांचा वापर टाळा.
▪️मीन : आज अती उत्साह दाखवायला जाऊ नका. योग्य संधीची वाट पहावी. जोडीदाराशी शांतपणे वार्तालाप करा.
Leave A Reply

Your email address will not be published.