Take a fresh look at your lifestyle.

…तर शिवसेनेच्या पाच जागाही आल्या नसत्या !

 

 

 

नांदेड : देगलूरमधून भाजपने शिवसेनेला दे धक्का देत सेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना मैदानात उतरवले आहे. साबणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या भाजप मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधायची संधी सोडली नाही.
आम्ही पंढरपूर जिंकून दाखवले. तुम्हा तिघांच्या विरोधात ग्रामपंचायती जिंकल्या, साखर कारखाने जिंकले. कराडच्या कृष्णा कारखान्यात 21 पैकी 21 जागा आम्ही जिंकल्या. तुम्ही कितीही एकत्र आले तरी आम्ही देगलूरची जागा जिंकणारच, असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
दरम्यान, आम्ही हे राज्य विजयी केलं नव्हते. मात्र, विधानसभेला सर्वाधित मतदान आम्हाला आहे. आम्हाला 20 आमदार कमी पडले आणि आम्हाला सर्व ठिकाणी धोका झाला. आम्ही धोका दिला असता तर शिवसेनेच्या पाच जागाही आल्या नसत्या, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला पुन्हा एकदा डिवचले आहे.