Take a fresh look at your lifestyle.

पारनेर पोलिसांनी केली दारूभट्टी उद्धस्त !

पारनेर : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तालुक्यात सलग दोन दिवस अवैध दारू धंद्यांच्या विरोधात कारवाई करून पावणेदोन लाखांचा दारूसाठा जप्त केल्यानंतर पारनेर पोलिसांनीही रविवारी संध्याकाळी तालुक्यातील म्हसे खुर्द येथे सुरू असलेल्या हातभट्टीवर छापा टाकून १३० लिटर गावठी दारू व १ हजार १०० लिटर गावठी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन नष्ट केले.हातभट्टी व्यावसायिक दत्तात्रेय पवार मात्र फरार झाला.
पारनेर पोलिसांनी रविवारी संध्याकाळी म्हसे खुर्द येथील हातभट्टीवर छापा टाकला. यावेळी गावठी दारू व कच्चे रसायन असा ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.याप्रकरणी पोलिसांनी दत्तात्रेय बच्चन पवार याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पवार पोलीस पथकाच्या हातावर तुरी देत फरार झाला. पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक आर.डी. काळे,सहायक पोलीस उपनिरीक्षक डी.ए. उजागरे,हवालदार बी.बी.भोसले यांनी कारवाई केली.