Take a fresh look at your lifestyle.

‘सर्जा -राजा’च्या जोडीसह निघाला असा निषेध मोर्चा !

ढोलकी,डफाने दणाणला परिसर.

0
शिरूर : राज्यात बैलगाडा शर्यती सुरू करण्याच्या मागणीसाठी आज शिरूर तहसील कचेरीवर निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सर्जा-राजा जोडीसह मोठ्या संख्येने बैलगाडा चालक व मालकांनी सहभाग घेतला. 
सर्व आंदोलकांनी एकत्र येत बैलांचे रिंगण करत उपस्थितांचे लक्ष वेधले. ‘शर्यत सुरू करा, बैल वाचवा’, ‘ बैलगाडा शर्यत सुरू झालीच पाहिजे’, अशा घोषणा देत, डफ, ढोलकी वाजवत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला होता. बैलगाडा शर्यत सुरू करण्याच्या मागणीसाठी निघालेल्या या मोर्चात तालुक्यातील विठ्ठलवाडी, तळेगांव ढमढेरे, सविंदणे, पाबळ, वरूडे आदी भागांतून बैलगाडा मालक व संघटनेचे पदाधिकारी यांच्यासह पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, खेड, मंचर, चाकण, मावळ, मुळशी आदी तालुक्यातील बैलगाडा शर्यत प्रेमी उपस्थित होते.
शर्यतीचे बैल आणि घोड्या आणि त्यांच्यावर उधळलेला भंडारा तसेच बैलगाडा मालकांच्या घोषणांनी शिरूर तहसील कचेरीचे वातावरण बदलून गेले होते. बैलगाडा शर्यत लवकरात लवकर सुरू न झाल्यास यापेक्षा मोठे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी बैलगाडा मालकांनी दिला. त्यानंतर तहसिलदार यांना याबाबत निवेदन देण्यात आले.
Leave A Reply

Your email address will not be published.