Take a fresh look at your lifestyle.

पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या भावात वाढ !

रविवारचा कांदा : बाजारभाव

पारनेर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात शुक्रवारी (३ ऑक्टोबर) रोजी झालेल्या कांदयाच्या लिलावात १७ हजार ३६२ गोण्यांची आवक झाली.
यावेळी ५ ते ६ लॉटला प्रतिक्विंटल ३५०० ते ४००० रूपये बाजारभाव मिळाला तर १ नंबरला २५०० ते ३४००, २ नंबरला १५०० ते २४०० तर ३ नंबरला ५०० ते १४०० रूपये प्रतिक्विंटल इतका भाव मिळाला. आठवडयातून दर रविवारी, बुधवारी व शुक्रवारी कांदा लिलाव होत असतात. शेतकऱ्यांनी आपली फसवणुक टाळण्यासाठी बाजार समितीतच कांद्याची विक्री करावी असे आवाहन संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.