Take a fresh look at your lifestyle.

पारनेर तालुक्याशेजारील ‘या’ गावात आहेत तब्बल 14 जण प्रशासकिय सेवेत !

देशभरात वाजतोय त्यांच्या कार्याचा डंका.

शिरूर: तालुक्यातील पिंपळे धुमाळ गावातील एक दोन नव्हे तर तब्बल 14 जणांनी राज्यात आणि राज्याबाहेर प्रशासकीय सेवेत काम करीत आपला ठसा उमटविला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात अधिकारी देणारे पिंपळे धुमाळ हे जिल्ह्यातील एकमेव गाव आहे. 
रमेश मल्हारी धुमाळ (सन २००९, सध्या सहायक पोलिस महानिरीक्षक, मुंबई), सुप्रिया शहाजी धुमाळ (सन २०११, सध्या पोलिस निरीक्षक, नागपूर ग्रामीण), सचिन शहाजी धुमाळ (सन २०१२, सध्या पोलिस निरीक्षक, राज्य गुप्तवार्ता), मिथून तान्हाजी धुमाळ (सन २०१२, वरिष्ठ वैज्ञानिक, कृषी मंत्रालय, दिल्ली), नीलम बाळासाहेब धुमाळ (सन २०१३, विक्रीकर निरीक्षक, पुणे), डॉ. श्रीधर तान्हाजी धुमाळ (सन २०१४, उपायुक्त, कस्टम, मुंबई), रुपाली रावसाहेब धुमाळ (सन २०१६, महिला व बालविकास अधिकारी, पालघर), नचिकेत विश्वनाथ शेळके (सन २०१८, आयपीएस, १६७ रॅंक, हैदराबाद पोलिस अकादमी), सागर विलास धुमाळ (सन २०१८, पोलिस निरीक्षक, नवी मुंबई), ज्ञानेश्वर खंडेराव धुमाळ (सन २०२०, पोलिस उपनिरीक्षक, नाशिक), प्रतिक अशोकराव धुमाळ (युपीएससी-१८३ रॅंक).
अस्मिता भगवान धुमाळ (सन २०१३, सहायक आयुक्त, पुणे महापालिका), सुप्रिया धुमाळ (सन २०१६, सहायक संचालक, कोकण भवन, मुंबई), निधी नचिकेत (सन २०१९,आयएएस, उपजिल्हाधिकारी गुंटूर, आंध्रप्रदेश) आदी अधिकारी सध्या राज्यात आणि राज्याबाहेर आपली सेवा बजावत आहेत.

पिंपळे धुमाळ गावाला याचा सार्थ अभिमान वाटतो. यावर्षीही प्रतिक अशोकराव धुमाळ याने यूपीएससी परिक्षेमध्ये 183 वी रँक मिळवून गावाची अधिकारी देण्याची उज्ज्वल परंपरा पुढे चालू ठेवली आहे.