Take a fresh look at your lifestyle.

यंदा नवरात्रीत कोणत्या दिवशी कोणता रंग?

रंगाबरोबरच जाणून 'घ्या' रंगाचे महत्त्व.

नवरात्रीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या नऊ दिवसांसाठी नऊ रंगांचं महत्त्व असते. यंदा यंदा नवरात्रीत कोणत्या दिवशी कोणता रंग आहे? त्याबद्दल जाणून घेऊयात..
▪️दिवस 1 : पिवळा – नवरात्रीचा आनंद आणि उत्साह साजरा करण्यासाठी या दिवशी पिवळा रंग परिधान करा.
▪️दिवस 2 : हिरवा – या दिवशी हिरवा रंग परिधान करा. जो निसर्गाचा आणि समृद्धीचा रंग आहे.
▪️दिवस 3 : राखाडी – हा रंग तृतीयेला घातला जातो. सूक्ष्मतेच्या दृष्टिकोनातून हा एक अद्वितीय रंग मानला जातो.
▪️दिवस 4 : नारंगी – चौथ्या दिवशीचा हा रंग उन्हाळ्याचे प्रतिनिधित्व करतो.
▪️दिवस 5 : पांढरा – या दिवशी सर्वशक्तिमान देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी पांढरे रंगाचे कपडे घाला. हा रंग शुद्धता आणि निरागसपणाचे प्रतीक आहे.
▪️दिवस 6 : लाल – हा आरोग्य, जीवन, अनंत धैर्य आणि तीव्र उत्कटतेचे प्रतीक आहे.
▪️दिवस 7 : रॉयल ब्लू – हा रंग सप्तमीला परिधान करा. जो उत्तम आरोग्य आणि समृद्धी आणतो.
▪️दिवस 8 : गुलाबी – हा रंग सार्वत्रिक प्रेम, आपुलकी आणि स्त्री आकर्षणाचे प्रतीक आहे.
▪️दिवस 9 : जांभळा – हा रंग नवव्या आणि शेवटच्या दिवशी परिधान करा. जो ऊर्जा, चैतन्य आणि स्थिरता एकत्र करतो.