Take a fresh look at your lifestyle.

पारनेर तालुक्यात १ लाख ७० हजारांचा दारूसाठा जप्त !

'एलसीबी' ची कारवाई,६ जणांना अटक.

0

 

 

 

पारनेर: तालुक्यात अवैध व्यावसाय मोठया प्रमाणात बोकाळले आहेत. अनेक हॉटेल,ढाब्यांवर अवैध दारू विक्री सुरू आहे.गावठी दारू धंद्याला तर उतच आला आहे. या दारुधंद्यावर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यामध्ये १ लाख ७० हजार ९०० रुपयांचा दारूसाठा जप्त करुन ६ जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन दिवसाच्या कालावधीत ५ ठिकाणी छापे टाकण्यात आले. या छाप्यामध्ये १ लाख ७० हजार ९०० रुपये किंमतीचा मुद्देमाल त्यामध्ये देशीविदेशी, ताडी, गावठी हातभटटीची दारु जप्त करण्यात आला आहे.या कारवाईत ६ आरोपींविरुध्द पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. संतोष मधुकर साळवे (वय ४२ रा. ढवळपुरी) याला अटक करून त्याच्याकडून ४० लिटर ताडीचा ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सीताराम विधाटे (वय २१ रा. वनकुटे) याला अटक करून त्याच्याकडून देशी विदेशी दारुचा ४ हजार १३० रुपयांचा मुद्देमाल जप्त, पंडा रामभाऊ खंडवे (वय ३० रा. पळशी),दत्तात्रय तिकोले (रा.वनकुटे) या दोघांना अटक करून त्याच्याकडून देशी विदेशी दारु १ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त, नितीन मारुती साळवे (वय ४५ रा. पळशी) याला अटक करून त्याच्याकडून देशी विदेशी दारु १ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त, संभाजी विठ्ठल गव्हाणे ( रा. म्हसे) याला अटक करून त्याच्याकडून १ लाख ६० हजाराचा गावटी हातभटटीची तयार दारु,कच्चे रसायन असा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे तालुक्यातील इतर अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
Leave A Reply

Your email address will not be published.