Take a fresh look at your lifestyle.

पाडळी रांजणगाव मध्ये शिवसेनेला खिंडार !

ज्येष्ठ शिवसैनिक ताराचंद करंजुले राष्ट्रवादीमध्ये.

 

पारनेर : आमदार निलेश लंके यांचा प्रभाव असलेल्या पाडळी रांजणगाव या गावांमधील शिवसेना पूर्णपणे भुईसपाट झाली आहे. माजी चेअरमन ताराचंद करंजुले यांच्यासह शिवसैनिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. निलेश लंके प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना यामध्ये यश आले आहे. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी वाडेगव्हाण येथील कार्यक्रमात पक्षात आलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले.
वाडेगव्हाण गटामधील पाडळी रांजणगाव एक महत्त्वाचे गाव आहे. येथे आमदार निलेश लंके यांचा सातत्याने प्रभाव राहिला आहे. या ठिकाणी निलेश लंके प्रतिष्ठान सुद्धा अत्यंत बळकट आहे. युवा कार्यकर्त्यांची मोठी फळी प्रतिष्ठानकडे आहे. दरम्यान या ठिकाणी शिवसेनेची सुद्धा ताकत होती. ग्रामपंचायत आणि सोसायटीमध्ये सेनेची सत्ता राहिलेली आहे. मात्र आमदार निलेश लंके यांनी पक्षाला रामराम ठोकल्यानंतर गावातही अनेक शिवसैनिक त्यांच्या बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आले. त्यामुळे सहाजिकच घडयाळाची ताकद गावांमध्ये वाढली.
वाडेगव्हाण येथे झालेला कार्यक्रमामध्ये माजी चेअरमन ताराचंद करंजुले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ आपल्या मनगटात बांधले आणि शिवसेनेला रामराम ठोकला. ते सध्या सोसायटीचे सदस्य आहेत. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये त्यांची पंचक्रोशीत ओळख आहे. ज्येष्ठ नागरिक गोर गरीब गरजूंना ते सातत्याने मदतीचा हात देतात. कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची वाडेगव्हाण गटामध्ये एक वेगळी ओळख होती. त्यांच्या माध्यमातून गावामध्ये शिवसेना तग धरून होती. मात्र राष्ट्रवादी प्रवेशाने भगव्याला मोठी खिंडार पडलेली आहे.
त्यांच्यासमवेत ज्येष्ठ शिवसैनिक सुभाष उबाळे, माजी सैनिक उत्तम करंजुले, लक्ष्मण करंजुले, रंगनाथ उबाळे यांनीसुद्धा शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. माजी सरपंच मारुती उबाळे , नवनाथ उघडे, सुरेश उबाळे यांच्या उपस्थितीत आणि काय हे शिवसैनिक राष्ट्रवादीवासिय झाले.यासाठी प्रद्युम्न करंजुले,गणेश करंजुले,गोरख उबाळे,दीपक करंजुले,पंडित करंजुले यांच्या प्रयत्नाने हा पक्ष प्रवेश भरून आला.
वाडेगव्हाण येथे संपन्न झालेल्या भूमिपूजन कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन आणि आयोजन युवा कार्यकर्ते किशोर यादव यांनी केले होते. भव्य दिव्य स्वरुपात पार पडलेल्या या कार्यक्रमाने संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधून घेतले. दरम्यान यादव यांना राळेगण सिद्धी गणातून पंचायत समिती ची उमेदवारी मिळावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्यांच्या समर्थनार्थ पाडळी रांजणगाव ते वाडेगव्हाण या दरम्यान भव्य रॅली काढण्यात आली होती. त्यामध्ये महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.