Take a fresh look at your lifestyle.

अरेरे : जामगावात नवऱ्यानेच केला बायकोचा खुन !

अन् झाला फारार,पोलिस तपास सुरू

 

पारनेर : तालुक्यातील जामगांव येथे एका महिलेचा तिच्या नवऱ्याने खुन करून फरार झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सदरचे हे कुटुंब रायगड जिल्ह्यातील असून मजुरीच्या कामानिमित्त ते पारनेर तालुक्यातील जामगाव येथे आले होते.
या घटनेतील मृत महिला शेवंता मच्छू नाईक ( वय 45 वर्ष ) रा .नागदारी ता .अलिबाग जिल्हा.रायगड असून ती व तिचा नवरा मच्छू नाईक हे महिनाभरापासून जामगांव येथे बाहेरील एका ठेकेदाराकडे काम करत होते.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, रविवारी सकाळी नेहमी प्रमाणे त्याच्या सोबत काम करणारे कामावर झाडे तोडायला निघाले असता मृत महिला शेवंता व तिचा पती मच्छू लवकर उठले नाही म्हणून त्याच्या सोबत काम करणारे कामाला सकाळी 6 वाजता निघून गेले व 12 वाजून 15 मिनिटांनी जेवणं करायला घराकडे आले असता अजून कामावर का आला नाही व कामावरून पळून गेला की काय याची खात्री करायला त्याच्या राहत्या झोपडीत जाऊन पाहिले.
यावेळी शेवंता मृत अवस्थेत दिसून आली व तिचा नवरा सकाळी पहाटे 5 वाजेपर्यंत होता व तो सकाळी पळून गेला अशी माहिती सोबत काम करणाऱ्या व्यक्तीनी दिली.या संदर्भातील माहिती आसपास राहणाऱ्या नागरिकांना पोलीसांना कळवली.पोलीसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले.