Take a fresh look at your lifestyle.

एक इच्छा आणि शिक्षक दिन साजरा करण्यास सुरुवात झाली!

असा आहे 'या' दिवसाचा इतिहास आणि महत्त्व.

 

आज शिक्षकदिन! विद्यार्थ्यांच्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान असणाऱ्या शिक्षकांच्या सन्मानार्थ दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा होतो. परंतु या दिवसाबद्दल जाणून घेण्यासाठी आपल्याला या दिवसाचा इतिहास आणि महत्त्व माहित असणे गरजेचे आहे.

भारताचे माजी राष्ट्रपती आणि महान शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर रोजी झाला होता. हा दिवस साजरा करता यावा यासाठी एकदा त्यांचे काही शिष्य त्यांच्याकडे आले आणि त्यांनी सांगितले की तुमचा वाढदिवस साजरा करायचा आहे, परवानगी द्या.

यावर राधाकृष्णन म्हणाले की, माझा वाढदिवस स्वतंत्रपणे साजरा करण्याऐवजी तो ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला तर मला अभिमान वाटेल. त्यांच्या या इच्छेचा मान ठेवत 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याचा पायंडा पडला. त्यानुसार 1962 मध्ये भारतात पहिल्यांदा शिक्षक दिन साजरा केला गेला.

राधाकृष्णन यांनी म्हटले होते की, संपूर्ण जग एक शाळा आहे. शिक्षक केवळ शिकवत नाहीत, तर जीवनातील अनुभवातून जाताना चांगले आणि वाईट यात फरक करायला शिकवतात. मुले हा दिवस त्यांच्या शिक्षकांचा आदर म्हणून साजरा करत असतात.