Take a fresh look at your lifestyle.

📌आजचे 12 राशींचे राशिभविष्य

🔸4 ऑक्टोबर 2021 

0

 

▪️मेष : गरजूंना मदत केल्याचे समाधान मिळेल. ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घ्या. मनावर ताबा ठेवा. जटिल समस्येवर तोडगा निघू शकेल.
▪️वृषभ : नोकरदार वर्गाला दिलासादायक दिवस. जवळचा प्रवास सुखाचा होईल. आज अधिक मेहनत घ्यावी लागेल.
▪️मिथुन : दुसर्‍यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करावा. सहकार्‍यांना कमी लेखू नका. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल.
▪️कर्क : आपल्याच नादात दिवस घालवाल. स्वत:च्याच मताला चिकटून राहाल. कौटुंबिक वातावरण उत्साही राहील.
▪️सिंह : प्रकृतीस जपावे. वादविवादात आपली सरशी होईल. व्यावसायिक क्षेत्रात अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा.
▪️कन्या : स्वत:वर कायम विश्वास ठेवावा. विजय तुमचाच होईल. आपली जबाबदारी ओळखून काम कराल. तुमची प्रतिमा उंचावेल.
▪️तूळ : घरात शांतता ठेवावी. अनावश्यक खर्चाला कात्री लावावी. दिनचर्येत थोडासा बदल करून पाहावा. जुनी देणी फेडाल.
▪️वृश्चिक : दिवसाची सुरुवात संपर्क साधण्यात जाईल. कौटुंबिक वातावरण शांत ठेवावे. खोट्या गोष्टींचा आधार घ्याल. उत्साहात दिवस जाईल.
▪️धनु : खर्चिक कामे निघतील. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. नवीन ओळख वाढवताना सावध रहा. दिवस कामात व्यस्त राहील.
▪️मकर : हलगर्जीपणा करून चालणार नाही. दिवस उत्साही असेल. आनंदी मनाने कार्यरत राहाल. नोकरीत सांभाळून निर्णय घ्या.
▪️कुंभ : व्यायामात खंड पडू देऊ नका. मुलांची चिंता सतावेल. जि‍भेवर ताबा ठेवावा. रखडलेली कामे हळूहळू पुढे सरकतील.
▪️मीन : नवीन ओळख फायदेशीर ठरेल. आततायीपणे कामे करू नका. आत्ममग्न राहाल. नातेवाईकांशी संपर्क साधला जाईल.
Leave A Reply

Your email address will not be published.