Take a fresh look at your lifestyle.

@ चिन्हाबाबत इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेऊयात

का वापरतात 'हे' चिन्ह ?

इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या जमान्यात सध्या @ या चिन्हाचा मोठ्या प्रमाणावर होतोय. मात्र तुम्हाला माहीत आहे का? या चिन्हाचा वापर सर्वात प्रथम कधी झाला? हे अक्षर कधी आले? याबाबत सर्व काही जाणून घेऊयात…

• आजघडीला जगभरात @ या चिन्हाला वेगवेगळ्या नावाने ओळखलेजाते.
चीन – फिरवलेला ‘ए’
तैवान – लहान उंदीर
डॅनिश – हत्तीची सोंड
युरोपातील देश- कीडा
कझाकस्तान – चंद्राचा कान
जर्मनी – स्पायडर मंकी
बोस्निया – झक्की A असे
स्लोवाकिया – अचारी फिश रोल
तुर्की – सुंदर A
• ईमेल आयडीसाठी @ या चिन्हाचा वापर सर्वप्रथम 1971 मध्ये झाला. 29 वर्षीय कॉम्पुटर इंजीनियर टॉमलिंसन यांनी या चिन्हाचा वापर केला.
• ईमेल आयडीमध्ये या चिन्हाचा वापर होण्या अगोदर इंग्रजीमध्ये भाव सांगण्यासाठी केला जात. म्हणजेच दहा सेंट प्रति पोळीच्या दराने 20 पोळ्यांचे भाव सांगणे म्हणजेच 20 पोळ्या @ दहा सेंट असे होय.

• या चिन्हाचा पहिला वापर 1536 मध्ये करण्यात आल्याचे बोलले जाते. इटलीच्या फ्लोरेंस शहरातील एका व्यापाराने आपल्या चिठ्ठीत वाईनचा भाव सांगण्यासाठी या चिन्हाचा वापर केल्याचे सांगितले जाते.
• @ चिन्हाचे मूळ स्पॅनिश आणि पोर्तुगाल भाषेत आहे. दोन्ही भाषेत या चिन्हाचा वापर वजन तोलण्यासाठी होत.