Take a fresh look at your lifestyle.

आज कोबी समोसा ट्राय करा…!

रविवारसाठी जराशी वेगळी रेसिपी.

 

आज रविवारी एक वेगळी रेसिपी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ती म्हणजे समोस्याचा एक वेगळा प्रकार कोबी ‘समोसा’…
साहित्य : चिरलेला कोबी, उकडलेला बटाटा, कापलेला कांदा, आलं-लसूण पेस्ट, जिरं, लाल तिखट, गरम मसाला, चाट मसाला, मीठ, गव्हाचं पीठ, मैदा, तेल, कोथिंबीर.

कृती : सर्वप्रथम गव्हाचं पीठ आणि मैदा समप्रमाणात घेऊन घट्ट भिजवा. त्यानंतर उकडून सोललेले बटाटे, चिरलेला कोबी एकत्र करून घ्या. कोबी थोडा वाफवून घेतला तरी चालेल. मग त्यामध्ये चिरलेली कोथिंबीर आणि मीठ घाला. नंतर कढईमध्ये थोडं तेल तापवून त्यामध्ये जिरं घालून बारीक चिरलेला कांदा लालसर परतून घ्यावा आणि त्यात चवीनुसार तिखट, चाट मसाला, गरम मसाला घाला. बटाटे आणि कोबीचं मिश्रण त्यात घालून एक वाफ आणा. भिजवलेल्या कणकेचे तुकडे त्रिकोणी आकारात लाटून त्यामध्ये बटाटा आणि कोबी यांचं सारण भरून साधारण गरम तेलात परतावं.