Take a fresh look at your lifestyle.

“लाज वाटली पाहिजे… ” पवारांसमोर गडकरी स्पष्टच बोलले !

'याचे' कारणही त्यांनी सांगून टाकले.

अहमदनगर : पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यात जेवढे दूध उत्पादित होते तेवढे संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यात होत नाही याची आम्हाला लाज आणि शरम वाटते अशा शब्दात केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी आपल्या स्पष्टवक्तेपणाचे दर्शन घडविले. 
नगर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा निमित्त शनिवारी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार एकाच मंचावर आले होते. यावेळी 3 हजार 28 कोटी रुपयांच्या महामार्गाचे भूमिपूजन तर 1हजार 46 कोटी रुपयांच्या महामार्गाचे लोकार्पण करण्यात आले. शरद पवारांनी देखील गडकरींच्या कामाचे तोंड भरून कौतुक केले.

पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यात होत असलेल्या दुग्ध उत्पादनाचा उल्लेख गडकरींनी आपल्या भाषणात केला.एकट्या पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यात जितके दूध संकलित होते, तेवढे विदर्भ आणि मराठवाड्यात होत नाही याची आम्हाला लाज आणि शरम वाटते असेही ते म्हणाले. दुधाच्या बाबतीत मोठी प्रगती आणि विकास पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांनी केला आहे. आपणाकडे मदर डेअरीची बैठक झाली. राज्याचे दुग्धविकास मंत्री सुनील केदार व अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. यावेळी मदर डेअरीचे चेअरमन आणि भारत सरकारमधील अधिकारीही उपस्थित होते. मदर डेअरीचे दैनंदिन दूध संकलन तीन लाख लिटर एवढे होते ते दहा लाख लिटरपर्यंत केले पाहिजे यासाठी आपण गेल्या दोन वर्षांपासून मागे लागल्याचे गडकरी यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना पुणे व कोल्हापूरसारखे दूध उत्पादन विदर्भ आणि मराठवाड्यात का होत नाही असा प्रश्न विचारीत याची तुम्हाला वाटते की नाही माहित नाही परंतु सुनील केदार आणि मला याची लाज वाटते असेही गडकरी यांनी सांगितले.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी गडकरी यांच्या कामाचे कौतुक करीत म्हणाले की, गडकरी हे आपल्याकडे येणाऱ्या राजकीय लोकप्रतिनिधींचा पक्ष पहात नाही तर त्याने आणलेले विकास कामे ते पाहतात.याचा परिणाम देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यात होतोय असे पवारांनी यावेळी जाहीरपणे सांगितले.