Take a fresh look at your lifestyle.

विकास कामांत भ्रष्टाचार प्रकरणी खंडपीठाची नोटीस !

म्हसणे सुलतानपुर ग्रामस्थ न्यायालयात.

पारनेर : तालुक्यातील म्हसणे सुलतानपुर ग्रामपंचायतीने सरकारी निधीतुन गेल्या पाच वर्षात केलेल्या विविध विकास कामांत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

येथील योगेश बबनराव कुलथे यांच्यासह स्थानिकांनी याबाबत पुरांव्यासह वरीष्ठांकडे तक्रारी दाखल केल्या होत्या, परंतु त्यांच्या तक्रारींची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे कुलथे यांनी या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात वकील चैतन्य धारुरकर यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे.हि याचिका दाखल करून, न्यायालयाने ग्रामपंचायत, गटविकास अधिकारी ,जिल्हा परिषद यांना नोटीस बजावली आहे.
ग्रामपंचायत म्हसणे सुलतानपुर यांनी रेशन घोटाळा, अतिक्रमण , घरकुल, पाणीपुरवठा योजना , वृक्षारोपण, ग्रामपंचायत दप्तर फेरकार , बांधकाम अशा विकास कामांच्या नावाखाली गैरकारभार केला आहे.याबाबतच्या तक्रारी वेळोवेळी ग्रामस्थांनी वरीष्ठांकडे केल्या परंतु तक्रारींच्या अनुषांगाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही. वरीष्ठांनी ग्रामपंचायत अधिकारी पदाधिकारी यांना पाठीशी घातल्यामुळे या प्रकरणी आता न्यायालयात दाद मागण्यात आली आहे.