Take a fresh look at your lifestyle.

विश्वास नांगरे पाटील हे महाविकास आघाडीचे माफिया !

किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप.

 

मुंबई : मुंबईचे पोलिस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील हे महाविकास आघाडी सरकारचे माफिया म्हणून काम करत असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला.

घोटाळ्यांच्या प्रकरणात राज्य सरकार तपासात अडथळे निर्माण करत असल्याने आम्हाला केंद्र सरकारकडे जावे लागते असेही ते म्हणाले. हसन मुश्रीफप्रकरणी मुंबई पोलिसांनी आपल्यावर केलेल्या कारवाईबाबत बोलताना सोमय्या म्हणाले, ‘नांगरे पाटील यांनी मला बेकायदा घरात कोंडून ठेवले.
पोलिसांना तेच सूचना देत होते. मात्र ठाकरे सरकारचा माफिया म्हणून याप्रकारे काम करता येणार नाही हे नांगरे यांनी लक्षात घ्यावे.मुश्रीफ यांनी दादागिरी करून स्वतःच्या लोकांना कंत्राट दिले. केंद्रीय मंत्रालयाने याची गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे कुठल्याही क्षणी हसन मुश्रीफ यांच्यावर कारवाई होईल.’