Take a fresh look at your lifestyle.

📌आजचे 12 राशींचे राशिभविष्य

🔸3 ऑक्टोबर 2021 

 

▪️मेष : आज आपली ऊर्जा कामी लावा. वादाच्या प्रसंगात हस्तक्षेप करू नका. कचाट्यात सापडू नका.
▪️वृषभ : मित्रांशी मतभेद वाढवू नका. कष्टाला पर्याय नाही हे लक्षात घ्या. मन स्थिर ठेवा. जवळच्या प्रवासाचा योग येईल.
▪️मिथुन : कौटुंबिक समाधान लाभेल. डोक्यावरचा ताण हलका होईल. व्यापार्‍यांना चांगला लाभ होईल. काही समस्यांचे निराकरण होईल.
▪️कर्क : घरासाठी खरेदी कराल. आत्ममग्न राहाल. टीकेकडे दुर्लक्ष करावे. केवळ कामावर लक्ष केंद्रित करा.
▪️सिंह : कर्तृत्वाने लोकांपर्यंत पोहोचाल. नीतीचा मार्ग अवलंबाल. फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नका.
▪️कन्या : मनाचा गोंधळ टाळावा. कामे तत्परतेने पार पाडा. सामाजिक मान वाढेल. दिवस मावळताना थकवा जाणवेल.
▪️तूळ : वाहन जपून चालवा. कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करून चालणार नाही. पद आणि अधिकार वाढेल.
▪️वृश्चिक : दिनक्रम व्यस्त राहील. नकारात्मक विचार दूर ठेवावेत. घरातील लोकांची मदत घ्यावी लागेल. महत्त्वाचे निर्णय लांबणीवर टाकू नका.
▪️धनु : अध्यात्मिक आवड वाढीस लागेल. गरजूंना योग्य सल्ला द्याल. मदतीचे समाधान मिळेल. आज नवीन चैतन्य जाणवेल.
▪️मकर : प्रलोभनापासून दूर रहा. वरिष्ठांना नाराज करू नका. जबाबदार्‍या वाढतील. जमिनीचे व्यवहार करताना सावध रहा.
▪️कुंभ : धनसंचय वृद्धिंगत होईल. कौटुंबिक वातावरणाकडे लक्ष द्यावे. वाहन खरेदीच्या योजना आखाल.
▪️मीन : आज घरी पाहुणे येतील. विद्यार्थी वर्गाला अपेक्षित यश मिळेल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. गरज ओळखून पैसे खर्च कराल.