Take a fresh look at your lifestyle.

‘या’ ग्रेट वट वृक्षाबद्दल तुम्हाला माहित आहे? 

याची नोंद चक्क गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आहे.

भारतात एक असा प्रचंड वटवृक्ष आहे ज्याची चक्क नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आहे. या झाडाला ‘ग्रेट वट वृक्ष’ म्हणून संबोधले जाते. हे झाड 250 वर्षांहून अधिक जुने असल्याचे बोलले जाते.

आचार्य जगदीश चंद्र बोस बोटॅनिकल गार्डन, कोलकाता येथे हे वटवृक्ष आहे. या झाडाची स्थापना 1783 मध्ये करण्यात आली होती. या झाडाच्या मुळे आणि फांद्या पाहून एखादे जंगल वसल्याचे वाटते.

हे झाड एकूण 14,500 चौरस मीटरपर्यंत (24 मीटर उंच) पसरलेले आहे. यात 3000 हून अधिक जटा आहेत, ज्या आता मुळांमध्ये परिवर्तीत झाल्या आहेत. या झाडाला जगातील सर्वात मोठे झाड किंवा ‘वॉकिंग ट्री’ देखील म्हटले जाते. या एकाच झाडावर पक्ष्यांच्या 80 पेक्षा जास्त प्रजाती वस्ती करतात.

1984 आणि 1925 मध्ये कोलकातामध्ये आलेल्या चक्रीवादळामुळे या झाडाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे या झाडाच्या अनेक शाखा कापाव्या लागल्या. असे असले तरी हे झाड जगातील सर्वात मोठे झाड म्हणून प्रसिद्ध आहे.

या वटवृक्षाच्या सन्मानार्थ 1987 मध्ये भारत सरकारने टपाल तिकीट जारी केले होते. याला बॉटनिकल सर्वे ऑफ इंडियाचे प्रतीक देखील मानले जाते. या झाडाची देखभाल काही लोकांच्या टीम करते. ज्याच्यामध्ये वृक्षशास्त्रज्ञ ते गार्डनर्स आधींच समावेश आहे. तसेच या झाडाची वेळोवेळी तपासणी देखील केली जाते.