Take a fresh look at your lifestyle.

महात्मा गांधींबद्दलच्या ‘या’ गोष्टी जाणून घ्या!

मात्र त्यांना 'हा' पुरस्कार मिळाला नाही.

 

आज २ ऑक्टोबर, महात्मा गांधी यांची जयंती. यानिमित्ताने त्यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात ज्या तुम्हाला माहित नसतील…
● शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी महात्मा गांधीजींचे नाव पाच वेळा नोबेल समिती समोर आले होते. मात्र त्यांना हा पुरस्कार मिळाला नाही.
● भारताच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध गांधीजी आयुष्यभर लढत राहिले. पुढे गांधीजींच्या मृत्यूनंतर 21 वर्षांनी त्यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट काढले गेले.
● महात्मा गांधींची अंतयात्रा तब्बल 8 किलोमीटर लांब होती. जवळजवळ 10 दशलक्ष लोकं यात सहभागी झाले होते.
● गांधीजींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक प्रसिद्ध व्यक्तींना पत्रे लिहीली. यात हिटलर, टॉल्सटॉय आणि आईन्स्टाईन यांचा समावेश होता.
● भारत स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्या संविधान सभेत पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भाषणादरम्यान गांधीजी उपस्थित नव्हते.
● अ‍ॅपल कंपनीचे संस्थापक स्टीव जॉब यांच्यावर महात्मा गांधीजींच्या विचारांचा मोठा पगडा होता. म्हणूनच त्यांना सन्मान देण्यासाठी ते गोल फ्रेमचा चश्मा वापरत.
● “महात्मा गांधी रोड” नावाने एकूण ५३ मोठे रस्ते भारतात आणि ४८ परदेशांत आहेत.
● गांधीजी १९१३ ते १९३८ एवढ्या कालावधीत ७९००० किमी अंतर पायी कापलं होतं.
● हत्येच्या एक दिवस अगोदर गांधीजी “कॉंग्रेस” बरखास्त करण्याबद्दल गांभीर्याने विचार करत होते, असे म्हटले जाते.
● गांधीजींच्या मृत्यृवेळी त्यांनी परीधान केलेले कपडे आजही संग्रालयात सुरक्षित ठेवण्यात आलेले आहेत.