Take a fresh look at your lifestyle.

जनावरांचे आजार आणि त्याचे नियंत्रण या विषयावर ऑनलाइन चर्चासत्र संपन्न !

सभापती प्रशांत गायकवाड यांची माहिती.

 

पारनेर : तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती व वाळुंज फार्मर्स प्रोड्युसर कंपनी वाळुंज यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी जनावरातील लाळ्या खुरकूत, लंपी व घटसर्प या आजारावरील लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय, लसीकरण, जनावरांच्या गोठ्याची स्वच्छता याविषयी शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी डॉ.सोमनाथ भास्कर दहिगाव येथील कृषी विज्ञान केंद्राचे विषय तज्ञ यांनी मार्गदर्शन केले. चर्चासत्राच्या सुरुवातीला सभापती प्रशांत गायकवाड यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत करुन चर्चा सभांच्या आयोजन विषयी माहिती दिली.
डॉ. सोमनाथ भास्कर यांनी प्रथम लाळ्या खुरकूत, लंपी व घटसर्प या आजारांबद्दल सविस्तर माहिती दिली तसेच त्यांनी शेतकऱ्यांना जनावरांच्या खाद्यासाठी मुरघास कसा करावा, जनावरांचे खाद्य कसे असावे याविषयी मार्गदर्शन केले.
चर्चासत्रात अनेक शेतकरी वर्गासह अधिकारीवर्ग ही उपस्थित होते.चंद्रपूरचे जिल्हा कृषी अधीक्षक श्री भाऊसाहेब बऱ्हाटे यांनीही सहभाग नोंदवून प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजने अंतर्गत एक जिल्हा एक उत्पादन या योजनेची माहिती शेतकऱ्यांना दिली.
यासाठी नगर जिल्हा दूध व दूध उत्पादन या प्रकल्पासाठी निवडलेला आहे असे त्यांनी सांगितले. या योजनेमध्ये वैयक्तिक लाभार्थी पासून विविध शेतकरी गट आणि शेतकरी उत्पादक कंपनी यांचा सहभाग नोंदवता येतो तरी या योजनेच्या माध्यमातून शासकीय अनुदान व बँक कर्ज या विषयी सविस्तर माहिती दिली. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
यापुढे ही अशा प्रकारचे चर्चासत्र कृषी उत्पन्न बाजार समिती, पारनेर व वाळुंज फार्मर प्रोड्यूसर कंपनी वाळूंज वतीने राबविण्यात येणार आहे. चर्चासत्रासाठी विषयांबाबत 9028055030 या मोबाईल नंबरवर संपर्क साधून माहिती द्यावी. कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर हाती घेतलेल्या या उपक्रमाचा तालुक्यातील शेतकर्‍यांना मोठा लाभ होत असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी यापुढेही अशा चर्चासत्रात सहभागी व्हावे असे आवाहन उपसभापती विलास झावरे व सर्व संचालक मंडळाने केले आहे.