Take a fresh look at your lifestyle.

…तर “येथे” पुन्हा लॉकडाऊन अटळ !

जिल्हाधिकाऱ्यांनी दिला सूचक इशारा.

संगमनेर : जिल्ह्यातील संगमनेर शहर हे कोरोना बाधित रुग्ण संख्येच्या आकडेवारीत आघाडीवर आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून संगमनेरची परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसून येत आहे. कंटेनमेंट झोन करूनही यश मिळत नाही, हा आता परीक्षणाचा विषय असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी संगमनेर येथील आढावा बैठकीत प्रतिपादन केले.
ते पुढे म्हणाले की, याबाबत प्रशासकीय पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे एक प्रशिक्षणवर्ग होणार आहे. परिसर शहर आणि तालुक्यातील टेस्टिंग वाढवावी तसेच संगमनेरचे परिस्थिती चिंताजनक असून लोकसंख्येच्या तुलनेत २५ टक्के नागरिक या ठिकाणी बाधित झालेले आहेत. दहा रुग्ण आढळल्यास तो एरिया कंटेनमेंट झोन करण्यात यावा अशा परिसराचे शंभर टक्के व्हॅक्सिनेशनला प्राधान्य देण्यात यावे.
पोलीस पाटील,तलाठी, सरपंच पदाधिकारी याबाबत प्रतिसाद देणार नसेल तर त्यांना नोटिस पाठवणार आहोत. तद्वतच याबाबत प्रांताधिकारी,तहसीलदार यांना ऑर्डर करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी यांनी दिले. शिस्तभंग केल्यास तलाठी, ग्रामसेवक, सरपंच त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार असल्याचे जिल्हाधिकारी भोसले म्हणाले.
राज्यशासनाने शाळा व मंदिराबाबत घेतलेला निर्णय हा राज्यासाठी लागू असला तरी जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्याची जबाबदारी आपल्यावर असल्याने जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी स्थानिक पातळीवर त्या-त्या अनुषंगाने निर्णय घेतले जातील व त्याचे आदेशही कार्यान्वित करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
संगमनेर शहराची कोरोना बाधिताची अशीच लक्षणीय वाढ होत राहिल्यास संगमनेर शहर पुढे लॉकडाऊन शिवाय कोणताही पर्याय उपलब्ध नसल्याचे भोसले यांनी सांगितले यावेळी प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे,तहसीलदार अमोल निकम, प्रशासकीय अधिकारी श्रीनिवास पगडाल, शहर पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, सभापती सुनंदा दिघे,उपसभापती नवनाथ अरगडे, जिल्हा परिषद मुख्याधिकारी राजेंद्र क्षीरसागर,डॉ. सोनाली बांगर, डॉ.भागवत दहीफळे आदी उपस्थित होते.