बांगलादेशातील एका वेगळ्या आणि आश्चर्यकारक गाईची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने घेतली आहे. या गाईची लांबी केवळ 20 इंच म्हणजे 50.8 सेमी इतकी असून तिचे नाव राणी असे होते. तिची उंची पाहून अनेक लोक तिला पाहण्यासाठी येत असतं.
राणीचे मालक असलेल्या काजी मोहम्मद अब सुफियान यांनी सांगितले कि, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डकडून एक मेल आला होता. त्यात राणीचे नाव नोंद झाल्याची माहिती आहे. गिनीजच्या वेबसाईटवरही याची खात्री करण्यात आलीय.
जगातल्या सर्वात लहान आकाराच्या या गायीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र खेदाची बाब म्हणजे या गाईचे काही दिवसांपूर्वी आकस्मित निधन झाले आहे. भारतातील केरळमध्ये सर्वात लहान गाय असून तिचे नाव माणिक्यम असे असून तिची लांबी केवळ 61 सेमी इतकी आहे.