Take a fresh look at your lifestyle.

प्रकल्प अधिकारी नारायण कराळे ‘क्लास वन’ !

सेवा ज्येष्ठतेनुसार मिळाली पदोन्नती.

 

 

पारनेर : येथील बालविकास प्रकल्प अधिकारी नारायण कराळे यांची वर्ग २ संवर्गातून वर्ग १ पदावर बढती झाली आहे. त्यांना मुंबई येथे नियुक्ती मिळाली आहे.
कराळे यांना २०११ साली बालविकास प्रकल्प अधिकारीपदी बढती मिळाली होती. त्यांनी जिल्ह्यात राहुरी, पाथर्डी, पारनेर तालुक्यात प्रकल्प अधिकारी म्हणून सेवा बजावली. बालविकास विभागात अनेक उपक्रम त्यांनी राबविले. आता त्यांची बालविकास प्रकल्प अधिकारी (शहर) या वर्ग १ च्या पदावर बढती झाली आहे.