Take a fresh look at your lifestyle.

गाडीचा अ‍ॅव्हरेज वाढवण्यासाठी ‘या’ टिप्स उपयुक्त…!

तर मग नक्की जाणून घ्याच !

 

वाढती महागाई पाहता गाडी मेन्टेन करणे अवघड होऊन बसलंय. म्हणूनच तुमच्या गाडीचा अ‍ॅव्हरेज वाढून देणाऱ्या काही टिप्स तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत…
● वेळोवेळी गाडीच्या टायरमधील हवेची तपासणी करा. कारण बऱ्याचदा गाडीच्या टायरची हवा गाडीच्या मायलेजवर परिणाम करत असते.
● जर तुमच्या गाडीचा टायर जास्त घासलेला असेल तर सहसा बदलून टाका.
● गाडी ओबडधोबडपणे चालवू नये. गाडीचा क्लच, ब्रेक, गिअर आणि अ‍ॅक्सिलेटरचा वापर योग्यरीत्या आणि योग्य तेवढाच करा.

● गाडीच्या स्पीडनुसार योग्यवेळी गिअर बदला. क्लच दाबून गाडी चालवणे शक्यतो टाळा.
● कमी अंतरावर जाण्यासाठी गाडीचा उपयोग टाळा. कारण याने गाडीचा मायलेज कमी होण्याची शक्यता असते. वारंवार इंजन चालू बंद केल्याने गाडीचा मायलेज कमी होऊ शकतो.
● तुमच्या गाडीची सर्व्हिसिंग वेळोवेळी करा. अशाने गाडीचा अ‍ॅव्हरेज चांगला राहण्यास मदत होते.
● नियमितपणे तुमच्या गाडीचे इंजन ऑईल, एअर फिल्टर, गिअर ऑईल बदला. याने गाडी चांगल्या स्थितीत राहते.
● पेट्रोल भरण्यासाठी नेहमी योग्य पेट्रोलपंपाची निवडा. कारण भेसळरुक्त पेट्रोलचे गाडीवर वाईट परिणाम होतात.
● हवेचा आणि गाडीचाही संबध आहे. गाडी चालवताना गाडीच्या काचा नेहमी बंद ठेवा. गाडीच्या काचा उघड्या ठेऊन गाडी चालवल्यास पेट्रोलची टाकी लवकर रिकामी होऊ शकते.
● गाडी हलकी राहील याची काळजी घ्या. गाडीत गरजेचे सामानच ठेवा. कारण गाडी जेवढी हलकी तेवढा गाडीचा मायलेज चांगला.