Take a fresh look at your lifestyle.

शरद पवारांच्या मुखात राम तर बगलेत सुरी असते !

सदाभाऊ खोत यांनी डागले टीकास्त्र.

जळगाव : शरद पवार हे जाणता राजा नाहीत. ते उद्योजकांचे नेते आहेत. त्यांच्या मुखात राम तर बगलेत सुरी असते, अशा शब्दांत माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर टीका केली. शरद पवारांनी कधीही शेतकऱ्यांची बाजू घेतली नाही. म्हणून मी त्यांना कधीही जाणता राजा म्हणत नाही, असेही खोत म्हणाले.
माजी मंत्री सदाभाऊ खोत हे सध्या पंचायत राज समितीच्या दौऱ्याच्या निमित्ताने जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. केंद्र सरकारचे 3 नवीन कृषी कायदे, उसाची एफआरपी, आरोग्य विभागाचा कारभार अशा विविध विषयांवर त्यांनी मते मांडत राज्य सरकारवर टीकास्त्र डागलं.
शरद पवार हे त्यांच्या आत्मचरित्रात म्हटल्याप्रमाणे वागत नाहीत. शेतकऱ्याचा खजिना लुटण्यात ते माहीर आहेत. म्हणूनच त्यांनी राज्य सरकारच्या वतीने उसाच्या एफआरपीचे तीन तुकडे करण्यास केंद्राला सांगितल्याचा आरोपही सदाभाऊ खोत यांनी यावेळी केला.