Take a fresh look at your lifestyle.

राष्ट्रवादी सांस्कृतिक सेलच्या जिल्हा सरचिटणीसपदी रियाज पठाण !

बाबासाहेब डोंगरे यांची नगर तालुकाध्यक्षपदी निवड.

 

 

अहमदनगर : राष्ट्रवादी चित्रपट, कला, साहित्य व सांस्कृतिक विभाग सेलच्या जिल्हा सरचिटणीसपदी रियाज पठाण तर नगर तालुका अध्यक्षपदी बाबासाहेब डोंगरे यांची निवड करण्यात आली. सदर निवडीचे पत्र राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या हस्ते देण्यात आले.
अहमदनगर येथील राष्ट्रवादी भवन येथे नुकतीच जिल्ह्यातील राष्ट्रवादी सांस्कृतिक सेल ची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, उपाध्यक्ष किसनराव लोटके, उपाध्यक्ष सिताराम काकडे, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. श्याम शिंदे, कार्याध्यक्ष भगवान राऊत, सरचिटणीस रियाज पठाण,अजयकुमार पवार,शाहीर कल्याण काळे, हसन शेख पाटेवाडीकर,शाहीर दिलीप शिंदे,जयश्री जगताप, डॉ रत्ना वाघमारे, शाहजान तांबोळी, राधाकृष्ण कराळे, डॉ. संदीप सांगळे व जिल्हातील कलावंत उपस्थित होते.
आपकी अपनी ऑनलाइन दुकान खोलना अब हो गया है बहुत ही आसान और सस्ता भी। 

सिर्फ़ ४९९ रुपए में आप अपने ख़्वाबोंको हक़ीक़त में बदल सकते हैं। 

आज ही http://www.apptmart.com पे रेजिस्टर कीजिये और एक क़दम सफलता की ओर उठायिये।

अधिक जानकारी के लिए आज ही सम्पर्क करें +91 70286 32421
या वेळी जिल्ह्यातील सांस्कृतिक सेलच्या जिल्हा कार्यकारीणी पदांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. या मध्ये नगर तालुक्यातुन सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेले सुप्रसिद्ध निवेदक व नाट्यकलावंत रियाज पठाण यांची सांस्कृतिक सेलच्या सरचिटणीसपदी तसेच नाट्य कलावंत बाबासाहेब डोंगरे यांची नगर तालुका राष्ट्रवादी सांस्कृतिक सेल च्या तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या हस्ते देण्यात आले.
रियाज पठाण व बाबासाहेब डोंगरे हे गेली २५ वर्षांपासून नाट्य क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी सादर केलेली “आम्ही सारे चालू,या घर आपलंच आहे, फक्त तुझ्यासाठी, गोष्ट लग्नानंतरची”अशी अनेक नाटके खूप गाजली आहेत. रियाज पठाण यांना कला, साहीत्य, नाट्यक्षेत्राची आवड असुन विविध नाटक, एकांकिका, शॉर्ट फिल्म, वेबसीरीज,ऑर्केस्ट्रा, मराठी चित्रपटाद्वारे ते कलाक्षेत्रात सक्रीय आहेत.
या वेळी बोलताना बाबासाहेब डोंगरे म्हणाले की वडगाव गुप्ता येथील रंगमुद्रा प्रतिष्ठानच्या माध्यमातून जिल्ह्यातील २०० कलाकारांचा अपघाती विमा करण्यात येणार असून कोरोना काळात सक्रिय योगदान देणाऱ्या जिल्ह्यातील कोरोना योध्याना पुरस्काराद्वारे सन्मानित करण्यात येणार आहे.
या प्रसंगी पारनेर तालुका प्रमुख भाऊसाहेब पटेकर,प्रा. सुदर्शन धस, संदीप कदम, जनार्धन बोडखे आदी उपस्थित होते.
पठाण व डोंगरे यांच्या निवडीबद्दल सरपंच विजय शेवाळे, ग्रामीण नाट्य संघाचे अध्यक्ष शिवाजी घाडगे, नवनागापूरचे सरपंच डॉ. बबनराव डोंगरे, आर. डी. पठाण, माजी सरपंच भानुदास सातपुते, उपसरपंच बाबासाहेब गव्हाणे, माजी पंचायत समिती सदस्य दत्ता सप्रे, पंचायत समिती सदस्य गुलाब शिंदे, गोरख गव्हाणे, तसेच रंगमुद्रा प्रतिष्ठानचे पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.