Take a fresh look at your lifestyle.

📌 आजचे 12 राशींचे राशिभविष्य

🔸 1 ऑक्टोबर 2021

▪️मेष : आज सामाजिक वादात पडू नका. दिवसभर धावपळ करावी लागेल. मुलांच्या बाबत चिंता लागून राहील.
▪️वृषभ : वरिष्ठांचा चांगला पाठिंबा मिळेल. आर्थिक बाजू स्थिरावेल. बोलण्यातून लोकांना प्रभावित कराल.
▪️मिथुन : आपल्या मनाप्रमाणे दिवस घालवाल. व्यापारात नवीन भागीदार सापडेल. आवडती वस्तू बरेच दिवसांनी सापडेल.
▪️कर्क : परिस्थिती पाहूनच निर्णय घ्या. कृतीत सामंजस्य आणावे. त्यामुळे मार्ग सहज सापडेल. विद्यार्थ्यांना नवीन संधी मिळतील.
▪️सिंह : मनातील इच्छा पूर्ण होईल. सहकार्‍यांशी वादात पडू नका. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. सर्व गोष्टीतून आनंद शोधाल.
▪️कन्या : सहकारी वर्गाची मदत घ्याल. स्वत:ला सिद्ध करण्याची संधी सोडू नका. घरातील मोठ्यांचे म्हणणे ऐका.
▪️तूळ : कामानिमित्त छोटे प्रवास होतील. कामाच्या ठिकाणी वाहवा होईल. मान, सन्मान वाढीस लागेल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ मिळेल. विरोधक पराभूत होतील.
▪️वृश्चिक : कार्यालयीन वातावरण चांगले राहील. तुमचा उद्देश साध्य होईल. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल.
▪️धनु : द्विधा मन:स्थितीतील निर्णय पुढे ढकला. वैचारिक दिशा बदलून पाहा. कामात सहकारी स्वखुशीने मदत करतील.
▪️मकर : मेहनतीला पर्याय नाही. कामात झालेले नुकसान भरून काढाल. घरात वादग्रस्त प्रसंग टाळा.
▪️कुंभ : कौटुंबिक जबाबदारी नीट पार पाडाल. नातेसंबंध दृढ होतील. विवाहाची बोलणी पुढे सरकतील.
▪️मीन : आज फटकून बोलू नका. घरातील वातावरण खेळकर राहील. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका.